गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप (जीईजी) या आघाडीच्या डायव्हर्सिफाइड इंजिनीअरिग आणि डिझाइनवर आधारित असलेल्या उद्योगसमूहाने त्यांची नवी ब्रँड आयडेंटिटीचे अनावरण केले. ग्राहक व भागधारकांसाठी नवे जग खुले करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. तसेच 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी डिझाइन-आधारित नवकल्पना, ग्राहक अनुभव अधिक चांगला करणे आणि शाश्वत निवडींसाठी प्राधान्य निर्माण करणे आहे.
याबद्दल गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जमशेद गोदरेज म्हणाले की, “भारताच्या विकासात्मक गरजांशी सतत जुळवून घेण्याच्या आमच्या क्षमतेमुळे आम्ही प्रगती साधत आलो आहोत. ब्रँड रीफ्रेश ही प्रक्रिया स्वतःला सतत नव्याने घडवण्याच्या आमच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. ग्राहकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या उपाययोजना व अनुभव उपलब्ध करून देत ग्राहकांसाठी अधिकाधिक उपयुक्तता सादर करणे ही आमची महत्त्वाकांक्षा आहे. उत्तम दर्जा व जटिल इंजिनीअरिंग हा आमचा गाभा कायम असून आमचा ब्रँड डायनामिक राहणे व आमच्या ग्राहकांच्या आकांक्षांची पूर्तता करणे आवश्यक आहे.”,
ब्रँड रीफ्रेशमुळे झालेला बदल
ब्रँड रीफ्रेशमुळे गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या व्यवसायांसाठी एकसंध आणि त्यांच्या स्वतःची अशी ओळख निर्माण होईल. नव्याने तयार करण्यात आलेल्या ब्रँड आयडेंटिटीमध्ये डोळ्यात भरणारा जांभळा रंग आहे. या सोबत संस्थापक पिरोजशा गोदरेज यांच्या सहीची आठवण करून देणारा कर्सिव्ह लोगो कायम ठेवण्यात आला आहे. हा लोगो ब्रँडच्या गुणवत्ता आणि विश्वासाच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. जांभळा रंग ऊर्जा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. तो गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या शाश्वत, डिझाइन-आधारित नवकल्पना आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेसह नेतृत्व करण्याच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे. तीन रंगांऐवजी एकाच रंगाचा स्वीकार केल्याने गटाच्या व्यवसायांमध्ये अधिक सुसंगती आणि समन्वय साधता येतो.
“नवी ब्रँड ओळख केवळ रंग बदलण्यापुरती मर्यादित नाही. ती ऊर्जा आणि गतिशीलतेचे प्रतीक आहे. ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन अधिक प्रीमियम उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, ‘राष्ट्राला प्राधान्य (नेशन फर्स्ट)’ व्यवसायांमध्ये अत्याधुनिक अभियांत्रिकी उपाययोजनांची जोड देण्यात आली आहे, ज्यामुळे जागतिक पातळीवर भारताच्या कौशल्याचे प्रदर्शन होते.”, असे गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या कार्यकारी संचालक नायरिका होळकर म्हणाल्या.
ग्रुपच्या प्रसिद्ध स्प्रिंगलेस लॉक या पहिल्या उत्पादनाची आठवण करून देत नव्या ब्रँड फिल्मची सुरुवात होते. या कॅम्पेनच्या माध्यमातून जिज्ञासू वृत्ती, समस्या सोडवण्याची कल्पक क्षमता आणि कधीही हार न मानता सतत प्रयत्न करत राहणे हा सकारात्मक दृष्टिकोन साजरा करण्यात आला आहे. ही मूल्ये मुलांमध्ये उत्तम प्रकारे दिसून येतात, जे प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारतात आणि एखादा उपाय शोधण्यासाठी नेहमी तत्पर असतात. गेल्या 127 वर्षांमध्ये जीईजीने भारत व जगभरात बदलणाऱ्या सामाजिक-आर्थिक संदर्भांनुसार कालसुसंगत राहण्यासाठी स्वतः नव्याने घडविले आहे. सतत नवीन शक्यता शोधण्याची आणि मर्यादांच्या पलीकडे जाण्याच्या वचनबद्धतेमुळे ब्रँडला ‘नवीन दालने खुली करण्याची’ क्षमता प्राप्त होते. या कॅम्पेनची संकल्पना लो लिंटास या आमच्या क्रिएटिव्ह पार्टनरची आहे, कॅटी बेल यांनी या दिग्दर्शक आहे तर एंटुराज फिल्म्सने याची निर्मिती केली आहे.