रशिया आणि युक्रेनमधील (Russia Ukraine War) युद्ध गेल्या महिनाभराहून अधिक काळ सुरु आहे. याच दरम्यान आज भारतीय बाजारात सोन्या-चांदीचे (Gold And Silver Price Today) दर नेमके काय आहेत ते जाणून घेणार आहोत. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने (Gold) आणि चांदी या दोन्ही धातूंची घसरण सुरू केली. एमसीएक्सवर सोन्याचे फ्युचर्स दर १५५ रुपयांनी घसरून ५१,७२१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. ही किंमत २४ कॅरेट शुद्ध सोन्याची आहे.
[read_also content=”जिरायती भागाला पाणी टंचाईची झळ; शिरसाई कालव्याला पाणी सोडण्याची मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/water-scarcity-in-arid-areas-demand-for-release-of-water-to-shirsai-canal-nrka-260927.html”]
आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्या-चांदीचे फ्युचर्स दर काहीसे कमी झालेले दिसत आहेत. आज २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,९५० रूपये झाला आहे. दोन दिवसांपूर्वी हा दर ४८,२१० रूपये होता. तर, २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,७२१ रूपये झाला आहे. चांदीचा दरातसुद्धा काहीशी घसरण दिसून येत आहे. आज १ किलो चांदीचा दर ६८,५२० रूपये आहे.
जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. सोन्याची स्पॉट किंमत ०.२८ टक्क्यांनी वाढून $१,९४८.८० प्रति औंस झाली. त्याच वेळी, चांदीचा स्पॉट रेट ०.७० टक्क्यांनी वाढून $२५.४४ प्रति औंस झाला. जागतिक बाजारातील तेजीचा परिणाम भारतीय बाजारावर लवकरच दिसून येईल, अशी अपेक्षा आहे.