नवी दिल्ली : सराफा बाजारानुसार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात किंचित वाढ (Gold Price Today) झाली आहे. मात्र दुसरीकडे चांदी स्वस्त (Silver Price Today) झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते.
[read_also content=”केंद्र सरकारने नियुक्त केलेले राज्यपाल ही महाराष्ट्राची मोठी समस्या, शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा आरोप https://www.navarashtra.com/delhi/delhi/shivsena-mla-vinayak-raot-said-tha-governor-is-big-problem-for-maharashtra-nrsr-230441.html”]
शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी सकाळी २४ कॅरेट (24 carats) सोन्याच्या दरात प्रति तोळा १३३ रुपयांची वाढ झाली. मात्र दुसरीकडे चांदी प्रति किलो मागे ३२२ रुपयांनी स्वस्त झाली आहे. भारतीय सराफा बाजारानुसार आज २४ कॅरेट सोन्याचा दर हा प्रति तोळा ४८०४८ रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारी सोन्याचा दर ४७९१५ इतका होता. त्यामध्ये आज ३२२ रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरामध्ये प्रति किलोमागे ३२२ रुपयांची घसरण झाली असून, चांदीचे दर ६१२२० रुपयांवर स्थिरावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ उतार होत असल्याचे पहायला मिळत आहे. दर सतत कमी अधिक होत असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण आहे.
२२ कॅरट सोन्याच्या किमतीमध्ये देखील आज वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या शुक्रवारच्या तुलनेमध्ये या आठवड्यात सोमवारी सोने हे १३३ रुपयांनी महागले आहे. एकीकडे सोने वाढले आहे, तर दुसरीकडे चांदी मात्र स्वस्त झाली आहे. २०२०च्या ऑगस्ट महिन्यात सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. सोन्याची किंमत प्रति तोळा ५६ हजारांवर पोहोचली होती. मात्र त्यानंतर सोन्याची किंमत सातत्याने कमी होत गेली. २०२१ च्या ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर ४४ हजारांवर आले होते. मात्र आता पुन्हा एकदा यामध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे.