नवी दिल्ली: भारतात 10 फेब्रुवारीला सोन्याचा भाव (Gold Price Today) कमी झाला आहे. दोन दिवस सोन्याचा भाव वाढलेला होता मात्र आज या भावात घसरण झाली आहे. शॉर्ट-टर्म यील्ड वाढण्याच्या दबावामुळे सोन्याची किंमत साधारण एक महिना घसरलेली होती.मात्र नंतर भाव वाढले.
जागतिक संकेतांनुसार शुक्रवारी सोन्याची किंमत कमी झाली आहे. चांदीचा भाव 0.82% टक्क्यांनी घसरला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं एप्रिल वायदा 232 किंवा 0.41% घसरणीसह 57,170 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आलं. एमसीएक्सवर चांदी मार्च वायदा 549 रुपयांच्या घसरणीसह 67,324 रुपये प्रति किलोग्रॅमवर आलं आहे.
[read_also content=”सीरियातल्या भूकंपामध्ये तिच्या आईचा झाला मृत्यू, 5 तास जोडलेली होती नाळ, चमत्कार पाहून हॉस्पिटलने ठेवलं ‘हे’ नाव https://www.navarashtra.com/world/girl-saved-in-turkye-earthquake-aya-name-given-by-hospital-nrsr-368789.html”]
युएस फेडकडून व्याज दराच्या वाढीच्या शक्यतेमुळे जागतिक स्तरावरील सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला. सोने 1,861.11 डॉलर प्रति औंस पर स्थिर राहीलं. अमेरिकी सोना वायदा 0.3 टक्क्यांनी घसरून 1,873.00 डॉलरवर आला.
अमेरिकेतील मंदीमुळे अनिश्चितता वाढली. कारण अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. आजचा फोकस यूकेचा जीडीपी, भारताचा आयआयपी यावर आहे.
विविध शहरांमधील सोन्याचा आजचा भाव
दिल्लीमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,310 रुपये
जयपुरमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,310 रुपये
पटनामध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,210 रुपये
कोलकातामध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,160 रुपये
मुंबईमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,310 रुपये
बेंगलुरुमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,210 रुपये
हैदराबादमध्ये24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,310 रुपये
चंडीगढमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,310 रुपये
लखनऊमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,310 रुपये
गुरुवारी बाजारात सोन्याच्या भावामध्ये चढ-उतार पाहायला मिळाला. अमेरिकी डॉलर इंडेक्स 0.23टक्क्यांनी धसरून 103.229 वर आला. बेंचमार्क यूएस 10 इयर ट्रेजरी यील्ड 1.97 टक्क्यांनी वाढून 3.684 झालं. हाच तो फॅक्टर आहे जो सोन्याच्या भावावर कॅप लावतो.