Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नववर्षात खुशखबर मिळणार… सरकार जीवन आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी हटवणार!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 21 व 22 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानमध्ये राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीत जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 12, 2024 | 04:39 PM
नववर्षात खुशखबर मिळणार... सरकार जीवन आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी हटवणार!

नववर्षात खुशखबर मिळणार... सरकार जीवन आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी हटवणार!

Follow Us
Close
Follow Us:

नवीन वर्ष 2025 मध्ये जीवन विमा आणि आरोग्य विम्यावरील जीएसटीमध्ये कपात होऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 21 व 22 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानमध्ये राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. या दोन दिवसीय बैठकीत 2025-26 या आर्थिक वर्षाच्या आधीच्या अर्थसंकल्पाबाबत सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांकडून सूचना आणि शिफारशी घेतल्या जातील. दुसऱ्या दिवशी अर्थात 22 डिसेंबर 2024 रोजी अर्थसंकल्पाची 55 वी बैठक होणार आहे. या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

मुदत विमा योजनांवरील जीएसटी रद्द होणार

जीएसटी कौन्सिलच्या आगामी बैठकीत, मुदत विमा योजनांवरील 18 टक्के जीएसटी पूर्णपणे रद्द करण्यास मान्यता दिली जाऊ शकते. तर ज्येष्ठ नागरिक आणि इतर लोकांसाठी जे 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा घेतात. त्यांच्यासाठी जीएसटी रद्द केला जाऊ शकतो. पीटीआयने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले आहे की, जीएसटी परिषद काही उत्पादने आणि सेवांवरील जीएसटी दर तर्कसंगत करू शकते. काही वस्तूंवरील जीएसटी दर 12 टक्क्यांवरून 5 टक्के कमी करू शकते.

हे देखील वाचा – ‘हे’ आहे भारतातील सर्वाधिक नोकऱ्या, पगारवाढ देणारं शहर; वाचा… मुंबईचा क्रमांक कितवा?

मंत्र्यांच्या गटाकडून मिळालीये मान्यता

आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटीचा विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने मुदतीच्या विम्यावरील जीएसटी काढून टाकण्यास आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विम्याला जीएसटीमधून सूट देण्याचे मान्य केले आहे. याशिवाय 5 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्यावर व्यक्तींनी भरलेल्या प्रीमियमवरील जीएसटी रद्द करण्याचाही प्रस्ताव आहे. तथापि, 5 लाख रुपयांवरील आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर 18 टक्के जीएसटी आकारला जाईल. सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत मंत्र्यांच्या गटाला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते.

सरकारला 22000 कोटी रुपयांचा महसूल लाभ होणार

जीएसटी दर तर्कसंगत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने, पॅकेज केलेले पिण्याचे पाणी, सायकली, व्यायामाच्या नोटबुक, लक्झरी घड्याळे आणि शूजवरील जीएसटी दरांमध्ये बदल सुचवले आहेत. जीएसटी दरातील या बदलामुळे सरकारला 22000 कोटी रुपयांचा महसूल लाभ होणार आहे.

हे असतील नवीन जीएसटी

यामध्ये जीएसटी कौन्सिलने 20 लिटरच्या पॅकबंद पिण्याच्या पाण्यावरील जीएसटी दर 18 टक्क्यांवरून, 5 टक्के, 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सायकलींवर 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्याचा प्रस्ताव दिला आहे. व्यायामाच्या नोटबुकवरील जीएसटी दर १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याचाही प्रस्ताव आहे. 15,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या चपलांवरील जीएसटी दर 18 टक्क्यांवरून 28 टक्के आणि 25,000 रुपयांहून अधिक किमतीच्या घड्याळांवर जीएसटी दर 18 टक्क्यांवरून 28 टक्के करण्याचा प्रस्ताव आहे.

Web Title: Good news as gst council may cut tax rates on health and life insurance premium in december 2024 in gst council meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 03:52 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.