Benglore is Indias highest job paying city Chennai Delhi Mumbai number
नोकऱ्यांच्या बाबतीत बंगळुरू आजही रोजगार संधी आणि वेतन वाढ देणारे भारताचे सर्वोच्च शहर म्हणून वर्चस्व गाजवत आहे. त्या ठिकाणी मागील वर्षाच्या तुलनेत 9.3 टक्के वृद्धी निदर्शनास आली असून, ही वाढ टेक्नॉलॉजी आणि व्यवसायाचे केंद्र म्हणून बंगळूरची जुनी ख्याती अधोरेखित करते. बंगळूरमधील सरासरी मासिक वेतन 29,500 रुपये इतके आहे. ही बाब भारताचा आघाडीचा स्टाफिंग समूह टीमलीझ सर्व्हिसेसच्या ‘जॉब्स अँड सॅलरीज प्राइमर रिपोर्ट’मधून समोर आली आहे.
बंगळूर पाठोपाठ चेन्नई, दिल्लीचा क्रमांक
बंगळूर पाठोपाठ चेन्नई आणि दिल्लीचा क्रमांक येतो. या ठिकाणी अनुक्रमे 7.5 टक्के आणि 7.3 टक्के इतकी मजबूत पगार वाढ आहे. यामधून या रोजगार बाजारपेठांचे स्पर्धात्मक स्वरूप दिसून येते. चेन्नईमधील सरासरी मासिक वेतन 24,500 रुपये असून, दिल्लीत ते 27,800 रुपये इतके आहे. मुंबई आणि अहमदाबाद येथे देखील स्थिर वेतनवाढ दिसून आली, ज्यामधून प्रमुख रोजगार केंद्रे म्हणून त्यांचे महत्व पक्के होते.
मुंबईतील सरासरी वेतन 25,100 रुपये
मुंबईतील सरासरी वेतन 25,100 रुपये आहे. पुण्याचे सरासरी वेतन 24,700 रुपये असून, त्या ठिकाणी आपली स्पर्धात्मक वेतन पातळी सांभाळण्यात आली आहे. या शहरांमध्ये वेतनवाढ 4 टक्के ते 10 टक्के या श्रेणीत आहे. उद्योग आघाडीवर 8.4 टक्के वेतनवाढीसह सर्वश्रेष्ठ कामगिरी ‘रिटेल’ने केली आहे. हाच कल कन्झ्युमर ड्यूरेबल्स (5.2 टक्के) आणि बँकिंग आणि इतर सेवांमध्येही (5.1टक्के) दिसून येतो.
तसेच या दोन्हींत व्यावसायिकांसाठी वृद्धीच्या दमदार संधी दिसत आहेत. दुसरीकडे, लॉजिस्टिक्स, एफएमसीजी, हेल्थकेअर आणि फार्मा, बांधकाम आणि रियल इस्टेट यांसारख्या क्षेत्रांत सामान्य वृद्धी दिसली आहे, जी कुशल व्यावसायिकांसाठीची त्यांची स्थिर मागणी दाखवते. सर्वाधिक वेतन देणाऱ्या उद्योगांमध्ये टेलिकम्युनिकेशन्स (29,200 रुपये), उत्पादन, इंजिनियरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर (28,200 रुपये), हेल्थकेअर आणि फार्मा (27,600 रुपये) आणि बांधकाम आणि रियल इस्टेट (27,000 रुपये) यांचा समावेश आहे.
एफएमसीजी उद्योगात सर्वाधिक वृद्धी
हा अहवाल गेल्या पाच वर्षात नियमित वेतन वाढ देणाऱ्या काही विशिष्ट नोकऱ्यांवर देखील प्रकाश टाकतो. एफएमसीजी उद्योगात सर्वाधिक वृद्धी दिसते, ज्यात ट्रेनी असोसिएट आणि पायलट ऑफिसर या नोकऱ्यांसाठी अनुक्रमे 9.5 टक्के आणि 8 टक्के इतका जोरदार सीएजीआर आहे. त्याच्या पाठोपाठ बँकिंग आणि इतर उद्योगात एचआर एक्झिक्युटिव्ह्ज (7.9 टक्के सीएजीआर) आणि सेल्स मॅनेजर (6.6 टक्के सीएजीआर) यांना लक्षणीय दीर्घकालीन वृद्धी मिळालेली दिसते.
शहरांचा विचार केल्यास, हैदराबाद येथे ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (8.1 टक्के सीएजीआर), अहमदाबादेत बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह्ज (7.9 टक्के सीएजीआर), पुण्यात सेल्स मॅनेजर (6.8 टक्के सीएजीआर) आणि दिल्लीत डेटा कोऑर्डिनेटर (6.6 टक्के सीएजीआर) या विशिष्ट रोल्समध्ये चांगली वृद्धी दिसते आणि त्यातून उद्योग आणि शहरांत कुशल व्यावसायिकांची व्यापक मागणी प्रतिबिंबित होते.