
good news mgl reduces cng and domestic png rates the new rate will be applicable from midnight today nrvb
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलियम पदार्थांच्या (Petroleum Products) दरात सातत्याने वाढ होत आहे (Rates Increase). दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात घेता सर्वसामान्यांची गेल्या दोन महिन्यांपासून बजेटशी दोन हात करताना मोठी दमछाक होत आहे. त्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा (Petrol Diessel Price Hike) अक्षरक्ष: भडका उडालेला असतानाच नुकतीच एक दिलासादायक बातमी आलेली आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) आपल्या सीएनजी (CNG) आणि देशांतर्गत पीएनजीच्या (Domestic PNG) दरात कपात केल्याने (Reduce Prices) सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
आज मध्यरात्रीपासून हे बदललेल्या दरांची अमंलबजावणी होणार आहे. नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमती पद्धतीत सुधारणा करण्याच्या भारत सरकारने (GOI) घेतलेल्या निर्णयाचे MGL ने स्वागत केले आहे. GOI चे हे पाऊल घरगुती आणि वाहतूक क्षेत्रात नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यास मदत करेल, जे भारत स्वच्छ आणि हरित बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
[read_also content=”त्या तीन महिला नग्न होताच पोलीस आणि नागरिकांची दमछाक, पोलिसांना पिटाळून लावण्यासाठी केले कृत्य; पोलिसांनी दाखल केला गुन्हा https://www.navarashtra.com/maharashtra/as-soon-as-the-three-women-were-naked-the-police-and-the-citizens-were-exhausted-and-the-police-acted-to-beat-them-up-kalyan-grp-police-filed-a-case-nrvb-381926.html”]
MGL ही नेहमीच ग्राहकांसाठी अनुकूल कंपनी राहिली आहे आणि नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी गॅसच्या किमतीत कोणतीही कपात आपल्या ग्राहकांना देत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये, MGL ने त्याच्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) ची किंमत रु. 2.5/किलो ने कमी केली होती. हे दर ३१ जानेवारी च्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले होते.
MGL घरगुती गॅसच्या किमतीतील या कपातीचा लाभ त्यांच्या घरगुती PNG आणि CNG ग्राहकांना देताना आनंदित आहे. त्यानुसार सीएनजीच्या किमतीत 8 Rs KG देशांतर्गत PNG (DPNG) 5 Rs KG मुंबई आणि आसपासच्या परिसरात आज मध्यरात्रीपासून लागू होतील.
CNG ची कमी झालेली MRP आता रु.79.00/Kg असेल आणि देशांतर्गत PNG रु. 49.00/SCM 07 एप्रिल 2023 च्या मध्यरात्रीपासून/ 08 एप्रिल 2023 च्या सकाळपासून प्रभावीपणे लागू असणार आहे.
[read_also content=”प्रशांत दामलेंची वाढदिवसाच्या दिवशी मोठी घोषणा पण… https://www.navarashtra.com/web-stories/marathi-actor-prashant-damle-made-a-big-announcement-on-his-birthday-nrvb/”]
MGL चे CNG आता मुंबईतील सध्याच्या किमतीच्या पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अनुक्रमे 49% आणि 16% ची आकर्षक बचत देते. तसेच, MGL चे डोमेस्टिक PNG ग्राहकांना अतुलनीय सुविधा, सुरक्षितता, विश्वासार्हता आणि पर्यावरण मित्रत्व प्रदान करताना घरगुती LPG च्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत सुमारे 21% बचत देईल.