Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

करचोरी थांबेना..! जीएसटी कायद्यातूनही भारतीयांनी शोधल्या पळवाटा; 1.2 लाख कोटींची करचोरी पकडण्यात सरकारला यश

देशात वस्तू आणि सेवा कर कायदा (जीएसटी) लागू झाल्यानंतर टॅक्स चोरी थांबेल, असे अनेकांना वाटले होते. मात्र, कितीही कडक कायदे केले तरी भारतीयांना त्यातून पळवाटा शोधण्याचा मार्ग माहिती असतोच. त्यामुळेच केंद्र सरकारच्या जीएसटी इंटेलिजन्सने २०२० पासून आतापर्यंत एकूण 1.2 लाख कोटी रुपये जीएसटी चोरी पकडली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 21, 2024 | 03:31 PM
करचोरी थांबेना..! जीएसटी कायद्यातूनही भारतीयांनी शोधल्या पळवाटा; 1.2 लाख कोटींची करचोरी पकडण्यात सरकारला यश

करचोरी थांबेना..! जीएसटी कायद्यातूनही भारतीयांनी शोधल्या पळवाटा; 1.2 लाख कोटींची करचोरी पकडण्यात सरकारला यश

Follow Us
Follow Us:

देशात वस्तू आणि सेवा कर कायदा (जीएसटी) लागू झाल्यानंतर टॅक्स चोरी करणे जवळपास अशक्य असेल. अशी वल्गना केंद्र सरकारकडून केली जात होती. मात्र, आता जीएसटी चोरी करण्यासाठी लोकांनी नवनवीन फंडे शोधले आहे. या फंडांच्या माध्यमातून देशभरातील काही नागरिकांनी तब्बल 1.2 लाख कोटी रुपयांच्या जीएसटीची चोरी केली आहे. केंद्र सरकारकडून जीएसटी कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी होण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटी इंटेलिजन्सची स्थापना केली आहे.

पकडली 1.2 लाख कोटी रुपये जीएसटी चोरी

केंद्र सरकारच्या जीएसटी इंटेलिजन्सने २०२० पासून आतापर्यंत एकूण 1.2 लाख कोटी रुपये जीएसटी चोरी पकडली आहे. याशिवाय केंद्र सरकारने कंपन्यांच्या बोगस नोंदणीला आळा घालण्यासाठी देखील विशेष मोहिम चालवली. ज्याद्वारे बोगस कंपन्यांची नोंदणी थांबवण्यासाठी मदत झाली आहे. याबाबत केंद्रिय अर्थमंत्रालयाच्या जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाकडून नुकतीच माहिती जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा – प्राध्यापक, सायंटिस्ट पदाची नोकरी सोडली; व्यवसायात उतरला, कमावतोय वर्षाला 2 कोटी रुपये!

आतापर्यंत 170 जणांना अटक, 59 हजार बनावट कंपन्या चौकशीच्या फेऱ्यात

जीएसटी इंटेलिजन्सने बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेणाऱ्या अनेकांना पकडले आहे. यामध्ये अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जीएसटी इंटेलिजन्सने वस्तू आणि सेवा कर चुकवणाऱ्या ५९ हजार बनावट कंपन्यांना कचाट्यात पकडले आहे. तर याबाबत आतापर्यंत 170 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे. असेही जीएसटी इंटेलिजन्सने म्हटले आहे.

हेही वाचा – आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा जगभरात डंका; दुसऱ्यांदा बनले जगातील सर्वोच्च केंद्रीय बँकर!

16 ऑगस्टपासून सरकारची विशेष मोहिम

जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने म्हटले आहे की, केंद्र आणि राज्य सरकारांकडून देखील आपआपल्या पातळीवर कंपन्यांच्या बनावट नोंदणी आणि जीएसटीची करचुकवेगिरी शोधत आहेत. सध्याच्या घडीला देशभरात याबाबत दोन महिन्यांची विशेष योजना राबनली जात आहे. 16 ऑगस्टपासून ही मोहिम सुरू झाली आहे. जीएसटी इकोसिस्टममध्ये बिलिंग सुरक्षित करण्यासाठी सरकार कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. बनावट बिलांवर ही कारवाई करण्यात येत आहे. असेही जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने म्हटले आहे.

Web Title: Government caught tax evasion of 12 lakh crores government action against 59 thousand fake companies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2024 | 03:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.