Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही’ सरकारी कंपनी सापडलीये आर्थिक अडचणीत; वाचा… कितीये कर्जाचा डोंगर!

सरकारी टेलिकॉम कंपनी एमटीएनएल आर्थिक अडचणीत सापडली आहे. या आर्थिक संकटाचे कारण म्हणजे महानगर टेलिफोन निगम लिमिटेडने (एमटीएनएल) बँकांची कर्जे थकवली आहे. कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) या आघाडीच्या बॅंकेने कंपनीचे बॅंक खाते एनपीएमध्ये टाकले आहे. कर्जाची रक्कम त्वरित भरावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दमही बँकेने एमटीएनएल कंपनीला दिला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 06, 2024 | 04:52 PM
'ही' सरकारी कंपनी सापडलीये आर्थिक अडचणीत; वाचा... कितीये कर्जाचा डोंगर!

'ही' सरकारी कंपनी सापडलीये आर्थिक अडचणीत; वाचा... कितीये कर्जाचा डोंगर!

Follow Us
Close
Follow Us:

देशातील आघाडीची सरकारी दूरसंचार कंपनी एमटीएनएल आर्थिक अडचणीत सापडली आहे. एमटीएनएल या कंपनीकडे सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) 326 कोटी रुपये थकीत आहेत. त्यापैकी २८१.६२ कोटी रुपये थकीत होते. जून महिन्यापासून कंपनीला कर्जाचा हप्ता बँकेत भरता आलेला नाही. यानंतर बँकेने एमटीएनएलचे खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) म्हणून घोषित केले आहे. बँकेने एमटीएनएलला कर्जाची थकित रक्कम त्वरित जमा करण्यास सांगितले आहे.

बँकेकडून कायदेशीर कारवाईचा इशारा

कर्ज भरण्याबाबत बँकेने एमटीएनएलला पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, कंपनीने घेतलेल्या कर्जावरील हप्ता आणि व्याज 30 जून 2024 रोजी थकीत झाले होते. तो ९० दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. आतापर्यंत कंपनीने कर्जाचा हप्ता भरलेला नाही. अशा परिस्थितीत 28 सप्टेंबरपासून कंपनीचे कर्ज खाते एनपीए श्रेणीत उतरवण्यात आले आहे. एसबीआयने एमटीएनएलला कर्जाची रक्कम त्वरित भरण्यास सांगितले आहे. जर कंपनीने पैसे भरण्यास उशीर केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. असेही बँकेने म्हटले आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

हे देखील वाचा – केक विकून कोट्यवधी रुपयांची कमाई करते ‘या’ क्रिकेटरची पत्नी; वार्षिक कमाई ऐकून चाट पडाल…

बँकेने मागितली मालमत्तेची माहिती

बँकेने एमटीएनएलच्या थकबाकीच्या परतफेडीवर सरकारकडून गॅरंटीच्या स्थितीबद्दल देखील माहिती मागवली आहे. याशिवाय एसबीआयने एमटीएनएलद्वारे चालवल्या जाणाऱ्या मालमत्ता मुद्रीकरण प्रकल्पांचे तपशीलही मागवले आहेत. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी दिल्लीतील 13.88 एकर जमीन विकसित करण्यासाठी एनबीसीसीसोबत केलेल्या कराराचा तपशील समाविष्ट आहे.

एमटीएनएलवर कर्जाचा डोंगर

एमटीएनएलवर 30 ऑगस्ट 2024 पर्यंत एकूण 32 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले होते की, ऑगस्टमध्ये सुमारे 422 कोटी रुपयांचे कर्ज भरण्यात अयशस्वी झाली होती. यामध्ये अनेक बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यासाठी कंपनी मुंबई आणि दिल्लीतील 150 हून अधिक मालमत्ता वाचवण्याचा विचार करत आहे. एसबीआयव्यतिरिक्त आता इतर बँका देखील एमटीएनएल कंपनीवर कठोर कारवाई करू शकतात.

Web Title: Government company mtnl did not pay the loan installment of government bank sbi account became npa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 04:52 PM

Topics:  

  • MTNL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.