फोटो सौजन्य - Social Media
शेअर बाजाराचा इतिहास फार मोठा आहे. ही उत्क्रांती फार मोठी आहे. शेअर बाजाराचा उगम १७ व्या शतकात झाला. हॉलंडमधील ऍम्स्टर्डॅममध्ये शेअर बाजाराचे मूळ आढळून येतात. सुरुवातीच्या काळामध्ये या बाजारात अनेक गुंतवणूकदारांनी आणि व्यापाऱ्यांनी विविध कंपन्यांचे शेअर खरेदी-विक्री करण्यास सुरुवात केली. ही पद्धत इतकी प्रसिद्ध झाली. जगभरात शेअर बाजार उभारले गेले. दरम्यान, या उत्क्रांतीमध्ये जगात आजही पावरमध्ये असणाऱ्या दोन स्टॉक एक्सचेंजचा जन्म झाला. १८०१ साली, ब्रिटनमध्ये लंडन स्टॉक एक्सचेंजची स्थापना करण्यात आली, जी पहिली औपचारिक स्टॉक एक्सचेंज मानली जाते. अमेरिकेमध्ये वॉल स्ट्रीटवर न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंजची (NYSE) स्थापना झाली. हे दोन्ही बाजार आजही जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
हे देखील वाचा : प्लस गोल्डचे ‘मीरा ज्वेलरी’ कलेक्शन लाँच ! ग्राहकांना अलंकारसोबतच मिळणार नवी सुविधा
भारतामध्ये प्रेमचंद रायचंद यांनी शेअर बाजाराची सुरुवात केली. १८५० साली मुंबईत शेअर बाजाराचा श्री गणेशा करण्यात आला. त्या वेळी व्यापाऱ्यांचा एक गट बोम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) या नावाने शेअर व्यवहार करू लागला. जरी ही सुरुवात १८५० मध्ये झाली असली तरी औपचारिकरित्या BSE ची सुरुवात १८७५ मध्ये झाली. ही आशियातील पहिली स्टॉक एक्सचेंज बनली. NSE ची सुरुवात १९९२ मध्ये झाली. आज NSE आणि BSE देशातील अर्थव्यवस्थेत फार मोठी भूमिका निभावतात. मुख्य म्हणजे BSE आशिया खंडातील पहिली स्टॉक एक्सचेंज आहे.
प्रथम, शेअर बाजार हा संपत्ती निर्माण आणि व्यवसाय वाढवण्यासाठी प्रमुख साधन मानला जात होता. मात्र, त्याच बरोबर त्यात जोखीमही होती, जी आर्थिक मंदी आणि क्रॅश यांसारख्या संकटांमुळे दिसून आली. 1929 मधील अमेरिकेतील ‘महासंकट’ (The Great Depression) हे त्याचे एक उदाहरण आहे. या संकटानंतर जगभरात शेअर बाजाराच्या नियमांमध्ये आणि संरचनेत अनेक बदल घडले, जेणेकरून भविष्यातील संकटांपासून बचाव करता येईल.
हे देखील वाचा : Profectus Capital ला IFC कडून 25 दशलक्ष डॉलर्सची बूस्ट! भारताच्या हवामान ध्येयांना मिळणार प्रोत्साहन
आताच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने शेअर बाजारात गुंतवणूक करणे फार सोपे झाले आहे. ऑनलाईन ट्रेडिंग तसेच अनेक मोबाईल ऍप्लिकेशन आहेत, ज्यांच्या सहाय्याने गुंतवणूक लोकं करत आहेत. AI च्या आगमनाने ट्रेडिंग आणखीन सोपी आणि सुलभ झाली आहे. यामुळे बाजारात प्रवेश अधिक सुलभ झाला असून, लहान गुंतवणूकदारही त्यात सहभागी होत आहेत. तरुण मोठ्या प्रमाणामध्ये शेअर बाजाराकडे आकर्षित आहेत. थोडक्यात, शेअर बाजाराच्या उत्क्रांतीचा इतिहास हा आर्थिक क्रांती आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा एक प्रवास आहे. हा बाजार आजही जागतिक अर्थव्यवस्थेत कणा मानला जातो, कारण तो व्यवसायाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो.