प्रोफेक्टस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड ( Profectus Capital)ने इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनला (आयएफसी) नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडी) जारी करून या कंपनीने 25 दशलक्ष डॉलरचा निधी उभारला आहे. प्रोफेक्टस कॅपिटल ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर (एमएसएमई) लक्ष केंद्रित नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे.
भारतातील एमएसएमईंसाठी ऊर्जा कार्यक्षम (ईई) यंत्रसामग्रीच्या वित्तपुरवठ्यासाठी आयफसीने केलेली पहिली गुंतवणूक आहे. ईई हा वित्तीय सेवा क्षेत्रातील एक विशेष ॲसेट क्लास आहे. हरित मत्तांना (ग्रीन ॲसेट्स) वित्तसहाय्य पुरविण्यासाठी या निधीचा वापर होणार असून या एनसीडींना ‘ग्रीन बॉण्ड्स’ असे नाव देण्यात आले आहे. प्रोफेक्टस कॅपिटलने इंटरनॅशनल कॅपिटल मार्केट असोसिएशनच्या ग्रीन बॉण्ड सिद्धांतांशी सुसंगत असणारे ग्रीन बॉण्ड फ्रेमवर्क विकसित केले आहे. आयएफसीच्या सहकार्यामुळे प्रोफेक्टस कॅपिटलला एमएसएमईंसाठी ईई उपकरणांसाठीच्या वित्तपुरवठ्यात वाढ करणे शक्य होईल. भारताच्या हवामान उद्दिष्टांसाठी हे महत्त्वाचे आहे.
आयएफसीच्या गुंतवणुकीला युरोपियन युनियनच्या दक्षिण आशियातील ‘क्लायमेट स्मार्ट अँड इन्क्लुसिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर इन साउथ एशिया’ (ACSIIS) या कार्यक्रमांतर्गत सल्लागार सेवांचे सहाय्य मिळालेल आहे. या अंतर्गत कंपनीला त्यांच्या सध्याच्या पोर्टफोलिओमधील ईई साधने ओळखण्यासाठी आयएफसी विशेष सल्लागार मदत प्रदान करेल. तसेच, त्यांच्या ऑपरेशन्स टीम आणि व्यवस्थापनाची क्षमतावृद्धी करणे आणि वाढीसाठी एक योजना तयार करणे यावर लक्ष केंद्रित करेल, ज्यायोगे हरितगृह वायू उत्सर्जन कमी होण्यास हातभार लागेल.
भारतातील अंदाजे 65 दश लक्ष एमएसएमई देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे 30% आणि निर्यातीमध्ये सुमारे 40% योगदान देत असल्या तरीही या क्षेत्रातील कर्ज तूट सुमारे 311 बिलियन आहे. यापैकी 50% अधिक एमएसएमई उत्पादन क्षेत्रातील असून त्यांच्या ऑपरेटिंग खर्चापैकी ऊर्जा खर्च 35% ते 40% इतका असतो. देशातील एमएसएमईंकडून 2030 पर्यंत ऊर्जा वापरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे. 2017मध्ये 30 मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड (tCO2) वापरला गेला होता, ते प्रमाण 72 मेट्रिक टन tCO2 पर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे जुनी यंत्रे बदलून नवीन ऊर्जा कार्यक्षम (ईई) यंत्रे आणि रेट्रोफिटिंगचा वापर केल्यास ऊर्जा बचतीची मोठी संधी उपलब्ध आहे.
प्रोफेक्टस कॅपिटलचे संस्थापक, सीईओ आणि पूर्णवेळ संचालक के. व्ही. श्रीनिवासन म्हणाले, “वर्ल्ड बँक ग्रुपची सदस्य असलेल्या आयएफसीसोबत भागीदारी करण्याचा आम्हाला आनंद आहे. आयएफसीसारख्या प्रतिष्ठित संस्थेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे, ही आमच्यासाठी एक सन्मानाची बाब असून आमच्या व्यवसाय प्रारुपाचा आणि कामगिरीचा भक्कमपणा यातून दिसून येतो. भारतातील एमएसएमईंसाठी ऊर्जा कार्यक्षम साधनांच्या खरेदीसाठी आयएफसीची ही पहिली गुंतवणूक आहे. त्यामुळे ही भागीदारी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान आहे. ही गुंतवणूक भारतातील एमएसएमईंमधील भांडवली गुंतवणुकीसाठी खूप उपयुक्त ठरेल. 2018 मध्ये आमच्या कामकाजाच्या सुरुवातीपासूनच अनेक आर्थिक आव्हानांनंतरही आम्ही व्यवसाय वृद्धी, मालमत्ता गुणवत्ता, आणि नफा यासह सर्व पातळ्यांवर चांगली प्रगती केली आहे. आयएफसीच्या ग्रीन बॉण्ड्समधील गुंतवणुकीमुळे एमएसएमई बाजारातील आमची स्थिती आणखी बळकट होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
आयएफसीच्या भारतातील कंट्री हेड वेंडी वर्नर म्हणाल्या, “या ॲसेट क्लासमधील आयएफसीची गुंतवणूक लहान व्यवसायांसाठी ईई वित्तपुरवठ्याची बाजारपेठ विकसित करण्यात मदत करेल. देशाच्या हवामान उद्दिष्टांना पाठिंबा देताना, आम्हाला विश्वास आहे की या निधीपुरवठ्यामुळे अशा प्रकारच्या आणखी सहभागांना प्रोत्साहन मिळेल, स्पर्धात्मकता वाढेल, रोजगार निर्माण होतील, आणि एमएसएमईंना करण्यात येणाऱ्या वित्तपुरवठ्याला चालना मिळेल. भारतातील वित्तीय संस्थांसाठी ग्रीन बॉण्ड्स हा अजूनही तुलनेने नवीन कर्जप्रकार आहे. प्रोफेक्टस सोबतची आमची भागीदारी ऊर्जा कार्यक्षमता क्षेत्रासाठी व्यावसायिक कर्जवितरणाची व्यवहार्यता अधोरेखित करेल आणि हरित, समावेशक आणि सक्षम विकासाला चालना देईल.”