
फोटो सौजन्य - Social Media
भारतातील आघाडीचा एण्ड-टू-एण्ड होम इंटीरिअर्स सोल्युशन्स प्लॅटफॉर्म असलेल्या होमलेनने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये लाभक्षमतेकडे निर्णायक वाटचाल करत मजबूत कामगिरी नोंदवली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीचा महसूल २२ टक्क्यांनी वाढून ७५६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, चौथ्या तिमाहीत ईबीआयटीडीएमध्ये सकारात्मक वाढ नोंदवण्यात आली आहे. या कामगिरीच्या बळावर कंपनीने पुढील १२ महिन्यांत प्रमुख मेट्रो शहरांपलीकडे विस्तार करत १०० नवीन फ्रँचायझी-नेतृत्वित स्टोअर्स सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे. होमलेनचे फ्रँचायझी नेटवर्क सध्या दोन मॉडेल्सअंतर्गत कार्यरत आहे. यामध्ये फ्रँचायझी-ओन्ड, कंपनी-ऑपरेटेड (एफओसीओ) आणि अलीकडेच सुरू करण्यात आलेले फ्रँचायझी-ओन्ड, फ्रँचायझी-ऑपरेटेड (एफओएफओ) मॉडेलचा समावेश आहे. २०२५ मध्ये कंपनीने देशभरातील ४० हून अधिक शहरांमध्ये आपली उपस्थिती वाढवत ५५ हजारांहून अधिक घरांची इंटीरिअर कामे पूर्ण केली आहेत. दररोज सरासरी ३० घरांमध्ये इन्स्टॉलेशनचे काम पूर्ण केले जात आहे.
मुंबई, बेंगळुरू, दिल्ली-एनसीआर यांसारख्या प्रमुख महानगरांसह सिलगुडी, जयपूर, कोचीसारख्या उदयोन्मुख शहरांमध्येही फ्रँचायझी-नेतृत्वित मॉडेलद्वारे तंत्रज्ञान-संचालित आणि विश्वासार्ह इंटीरिअर सोल्युशन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कंपनीच्या मालकीच्या सॉफ्टवेअर प्रणाली आणि सक्षम पुरवठा साखळीमुळे वेळेत व दर्जेदार सेवा देणे शक्य झाले आहे.
होमलेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक श्रीकांत अय्यर यांनी सांगितले की, २०२५ मधील प्रगतीमुळे कंपनीच्या पुढील विकासाचा मजबूत पाया घातला गेला आहे. फ्रँचायझी नेटवर्कचा विस्तार आणि ऑपरेशनल क्षमतेतील सुधारणा यामुळे देशभरातील अधिकाधिक घरमालकांपर्यंत तंत्रज्ञान-सक्षम इंटीरिअर सेवा पोहोचवता आल्या आहेत. २०२६ मध्ये प्रमुख शहरांसह द्वितीय व तृतीय श्रेणीतील बाजारपेठांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कंपनीच्या एण्ड-टू-एण्ड डिझाइन-ते-उत्पादन दृष्टिकोनाचा केंद्रबिंदू म्हणजे एआय-संचालित ‘स्पेसक्राफ्ट’ हे डिझाइन व नियोजन प्लॅटफॉर्म. मशीन लर्निंग आणि ३डी व्हिज्युअलायझेशनच्या साहाय्याने अचूक किंमत अंदाज आणि जलद नियोजन शक्य होते. याशिवाय, १६० हून अधिक लॅमिनेट शेड्स, टायरॉक्स हार्डवेअर आणि हायड्रोगार्ड प्लस बोर्ड्ससारखी खाजगी लेबल उत्पादने कंपनीच्या नेटवर्कला बळकटी देतात.
२०२५ मध्ये होमलेनने डिझाइनकॅफेचे संपादन करून बाजारातील आपली पकड अधिक मजबूत केली. आर्थिक वर्ष २०२४ मधील १२१.७ कोटी रुपयांच्या निव्वळ नुकसानीत घट करत ते आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ८० कोटी रुपयांपर्यंत आणण्यात यश मिळाले आहे. याशिवाय, ईबीआयटीडीए नुकसान १५ टक्क्यांवरून ९.९ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. कंपनीने २०२४ मध्ये २२५ कोटी रुपयांचे भांडवल उभारून दीर्घकालीन विकास योजनांना पाठबळ दिले आहे. २०२६ कडे वाटचाल करताना, मालमत्ता-केंद्रित फ्रँचायझी मॉडेल, तंत्रज्ञान-आधारित अंमलबजावणी आणि वेळेत वितरण या त्रिसूत्रीवर आधारित धोरण राबवत होमलेन संपूर्ण वर्षात लाभक्षमता साध्य करण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जात आहे.