Bharat Taxi App: आता Ola-Uber ला विसरा; कारण, केंद्र सरकार सुरू करणार आहे 'ही' टॅक्सी (फोटो-सोशल मीडिया)
Bharat Taxi App: भारतात ओला आणि उबेर यांनी गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण टॅक्सी बाजारावर पकड मजबूत केल्याचे दिसून येते. या दोन खासगी टॅक्सी कंपन्यांनी भाडेवाढ करून प्रवाशांना फटका दिला किंवा कधी चालकांना अधिक कमिशनचा त्रास झाला होता. पण आता, हे चित्र बदलू शकते कारण, केंद्र सरकार नवी सेवा लाँच करणार आहे. १ जानेवारी २०२६ पासून केंद्र सरकार ‘भारत टॅक्सी ॲप’ (Bharat Taxi App) सुरू करणार आहे. विशेषत: सहकारी तत्त्वावर हा ॲप आधारित असून यामुळे टॅक्सी उद्योगात महत्वाचा बदल होऊ शकतो.
‘भारत टॅक्सी’ म्हणजे काय?
‘भारत टॅक्सी’ खासगी कंपनीचे ॲप नसून सहकारी मॉडेल असेल जे चालकांच्या सहभागातून चालेल. या मॉडेलमध्ये चालक फक्त कामगार नसून भेट भागीदार असेल. याच गोष्टी ओला-उबेरपेक्षा वेगळं आणखी लोकाभिमुख ठरवतील.
प्रवाशांसाठी दिलासादायक बदल
टॅक्सी चालकांना होईल मोठा फायदा
ओला-उबेरसोबत काम करताना अनेक चालक नाराज असून २५ ते ३० टक्के कमिशन कापल्यानंतर त्यांच्या हातात फारसं काही उरत नसल्याची त्यांची तक्रार आहे. हेच सरकारने लक्षात घेऊन हा ॲप बनवला आहे.
सध्या, भारत टॅक्सी दिल्ली-NCR मधून सुरू होणार असून, त्यानंतर मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये ही सेवा पोहोचवली जाईल. सध्या, ओला-उबेरचं जरी नेटवर्क खूप मोठं असलं तरी फायदेशीर असलेले सरकारी ॲप प्रवाशांना पसंद पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
१ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार ‘भारत टॅक्सी’ हा फक्त पर्याय नसून टॅक्सी उद्योगातील महत्वाचा आणि आर्थिक दिलासा देणारा नवा प्रयोग असेल. प्रवाशांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवास मिळेल, तसेच चालकांना सन्मानाचं आणि भरपूर उत्पन्न देखील मिळेल.






