मुकेश अंबानींचे तीनही व्याही किती श्रीमंत आहेत? वाचा... कितीये मेहता, पिरामल, मर्चंट यांची संपत्ती!
अनंत आणि राधिकाच्या लग्नानंतर (anant radhika wedding) आता त्यांच्या लग्नाच्या खर्चाची सर्वदूर चर्चा होत आहे. अशातच आता मुकेश अंबानी यांना दोन मुले आणि एक मुलगी असून, तिघेही विवाहित आहेत. ज्यामुळे सध्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे तीनही व्याही नेमके किती श्रीमंत आहेत? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण मुकेश अंबानी यांचे ‘स्वाती आणि अजय पिरामल’ (ajay piramal), ‘मोना आणि रसेल मेहता’ (Russell Mehta) आणि शैला आणि विरेन मर्चंट हे तिन्ही व्याही नेमके किती संपत्तीचे मालक आहेत. याबाबत आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत…
रसेल मेहता यांची संपत्ती?
मोना आणि रसेल मेहता : मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याचा श्लोका मेहता हिच्याबरोबर विवाह झाला आहे. श्लोका ही मोना आणि रसेल मेहता यांची मुलगी आहे. रसेल मेहता यांची देशातील आघाडीचे उद्योगपती म्हणून ओळख आहे. रसेल मेहता हे ‘रोझी ब्लू’ या हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मोठ्या ब्रँडचे एमडी आहेत. विशेष म्हणजे या कंपनीचा व्यवसाय १२ देशांमध्ये विस्तारला आहे. तर भारतात २६ शहरांमध्ये कंपनीची ३६ हून अधिक स्टोअर्स आहेत. रसेल मेहता यांच्या एकूण संपत्तीबाबत सांगायचे झाले तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, रसेल मेहता यांची एकूण संपत्ती ही जवळपास ३ हजार कोटी रुपये इतकी आहे.
अजय पिरामल यांची संपत्ती?
स्वाती आणि अजय पिरामल : मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचा विवाह पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी झाला आहे. पिरामल समूहाचा व्यवसाय हा फार्मापासून ते हेल्थ आणि वित्त क्षेत्रापर्यंत विस्ताराला आहे. जगातील ३० हून अधिक देशांमध्ये हा समूह कार्यरत आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, अजय पिरामल यांची एकूण संपत्ती ही जवळपास तीन अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास २५ हजार कोटी रुपये इतकी आहे. ज्यामुळे मुकेश अंबानी यांच्या अन्य दोन व्याहींच्या तुलनेत अजय पिरामल हे अधिक श्रीमंत आहेत.
विरेन मर्चंट यांची संपत्ती?
शैला आणि विरेन मर्चंट : मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा नुकताच १२ जुलै रोजी पार पडला. राधिका मर्चंट ही शैला आणि विरेन मर्चंट यांची मुलगी आहे. विरेन मर्चंट हे फार्मा कंपनी एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत. ते इतरही अनेक कंपन्यांचे संचालक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची संपत्ती ही जवळपास ७५५ कोटी रुपये आहे.