Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मेक इन इंडिया’ला बळ! AM/NS India कडून दोन नवीन प्रीमियम स्टीलची घोषणा; घरगुती उपकरणांच्या निर्मितीत क्रांती येणार

AM/NS India ने घरगुती उपकरणे आणि औद्योगिक निर्मितीसाठी 'एएम/एनएस व्हायब्रन्स' आणि 'एएम/एनएस ऑप्टिमा' हे दोन प्रीमियम स्टील ब्रँड्स लाँच घोषणा केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 16, 2026 | 08:13 PM
'मेक इन इंडिया'ला बळ! AM/NS India कडून दोन नवीन प्रीमियम स्टीलची घोषणा (Photo Credit - X)

'मेक इन इंडिया'ला बळ! AM/NS India कडून दोन नवीन प्रीमियम स्टीलची घोषणा (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • ‘मेक इन इंडिया’ला बळ!
  • AM/NS India कडून दोन नवीन प्रीमियम स्टील ब्रँड्स लाँच
  • घरगुती उपकरणांच्या निर्मितीत क्रांती येणार
मुंबई/ फेब्रुवारी २०२६: आर्सेलॉर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया (एएम/ एनएस इंडिया) ने आज अप्लायन्स आणि इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टिममधील ‘ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर्स’ (ओईएमएस)च्या वाढत्या डिझाइन-प्रणीत गरजा पूर्ण करण्यासाठी ‘एएम/ एनएस व्हायब्रन्स’ आणि ‘एएम/ एनएस ऑप्टिमा’ – ह्या दोन जागतिक दर्जाच्या, प्रीमियम ब्रँडेड स्टील सोल्यूशन्ससह त्यांच्या मूल्यवर्धित पोर्टफोलिओला मजबूत बनवण्याची घोषणा केली.

पृष्ठभागाची सुसंगत गुणवत्ता, कडक सहनशीलता आणि मोठ्या प्रमाणात विश्वासार्ह कामगिरी ह्यांचा मेळ घालणाऱ्या स्टीलच्या वाढत्या मागणीसह, ‘एएम/ एनएस इंडिया’ त्यांचा मूल्यवर्धित पोर्टफोलिओ ब्रँडेड ऑफरिंग्जसह वाढवत आहे,ज्या प्रीमियम, आंतरराष्ट्रीय स्तरावर बेंचमार्क केलेली गुणवत्ता देशांतर्गत उपलब्ध करून देताना आयातीवरील अवलंबित्व कमी करतात.ह्या दोन ब्रँडेड कोटेड ऑफरिंग्ज आता मूल्यवर्धित उत्पादन पोर्टफोलिओचा भाग आहेत, ज्यामध्ये Optigal® Magnelis®, Optigal® Prime, Optigal® Pinnac आणि इतर ह्यांचा समावेश आहे -ज्यातील प्रत्येक विविध ॲप्लिकेशन्समधील सुसंगतता, कार्यक्षमता आणि टिकाऊपणासाठी प्रमाणित आहे.

श्री रंजन धर ,आर्सेलॉर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया (एएम/एनएस इंडिया) चे डायरेक्टर आणि व्हाइस प्रेसिडेंट – सेल्स अँड मार्केटिंग, ह्यासंदर्भात बोलताना म्हणाले: “अचूक उत्पादन आणि सुसंगत ब्रँड गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केलेल्या ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर्स (ओईएम) साठी ; सामग्रीची निवड ही उत्पादकता,खर्च आणि दीर्घकालीन कामगिरीवर थेट परिणाम करते. ह्या पार्श्वभूमीवर, ‘एएम/ एनएस व्हायब्रन्स‘ आणि ‘एएम/ एनएस ऑप्टिमा’ ह्यांची भर पडणे, हे ओईएम उत्पादकता आणि मूल्य निर्मितीला पाठबळ देण्यासाठी आमच्या ब्रँडेड स्टील पोर्टफोलिओचा विस्तार करणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ह्या दोन कोटेड स्टील ऑफरिंग्ज- ‘स्मार्टर स्टील्स, ब्राइटर फ्युचर्स’- ह्या आमच्या ब्रँड वचनानुसार नावीन्यपूर्ण, उच्च-गुणवत्तेच्या स्टील सोल्यूशन्ससह पसंतीचे सोल्यूशन प्रोवायडर म्हणून आमचे स्थान मजबूत करतात. जागतिक दर्जाचे मूल्यवर्धित स्टील्स देशांतर्गत उपलब्ध करून देऊन, आम्ही ‘मेक इन इंडिया’ व्हिजनमध्ये योगदान देत आहोत, तर आमच्या ग्राहकांना आत्मविश्वासाने विभिन्न उत्पादने तयार करण्यास आणि देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक फायदा मिळविण्यास सक्षम करत आहोत. आमच्या मूल्यवर्धित स्टील पोर्टफोलिओसाठी अप्लायन्स आणि इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टिम्स वाढीचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत, कारण आम्ही उद्देशपूर्ण अभिनव कल्पना पुढे नेतो, ज्या आमच्या ग्राहकांना मदत करतात अधिकाधिक ‘आत्मनिर्भर’ बनण्यासाठी.”

परदेशी पर्यटकांसाठी NPCI कडून मोठी भेट; आता भारतात येणारे पाहुणेही वापरू शकणार UPI

एएम/ एनएस व्हायब्रन्स -प्रीमियम कलर-कोटेड स्टील

एएम/ एनएस व्हायब्रन्स अप्लायन्स ओईएमएस साठी शक्ती, अचूकता आणि उत्कृष्ट सरफेस ॲस्थेटिक्स ह्यांचा मेळ घालणारे,एक प्रीमियम कलर-कोटेड स्टील सोल्यूशन आहे.घरांमध्ये आणि व्यावसायिक ठिकाणी अप्लायन्सेस डिझाइन्सची नजरेत अधिकाधिक भरणारी वैशिष्ट्ये बनत असताना, उत्पादकांना सुसंगत रंग, नियंत्रित चमक आणि परिष्कृत फिनिशसह टिकाऊपणा आणि कार्यक्षम उत्पादनक्षमता ह्यांचा मेळ घालणाऱ्या सामग्रीची आवश्यकता असते. ‘एएम/ एनएस व्हायब्रन्स’ अचूकपणे घडवलेल्या स्टील सब्सट्रेट्सवर लागू केलेल्या प्रगत कोटिंग टेक्नॉलॉजीद्वारे ह्या गरजांची पूर्तता करते, ज्यामुळे फॅब्रिकेशनपासून अंतिम वापरापर्यंत विश्वसनीय कामगिरी सुनिश्चित होते. ‘एएम/ एनएस व्हायब्रन्स’ ही उत्पादित अप्लायन्सेस दिसण्यात आकर्षक आणि टिकाऊ असल्याची खात्री देते . रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन्स, मायक्रोवेव्ह ओव्हन्स आणि वॉटर डिस्पेंर्सरसह विविध अप्लायन्स ॲप्लिकेशन्ससाठी ते साजेसे आहे.

एएम/ एनएस ऑप्टिमा- ट्रू झीरो-स्पँगल गॅल्वनाइज्ड स्टील

एएम/एनएस ऑप्टिमा’ ही भारतातील सर्वात प्रीमियम ट्रू झीरो-स्पॅंगल गॅल्वनाइज्ड स्टील उत्पादनांपैकी एक आहे. हे पारंपारिक गॅल्वनाइज्ड स्टीलपेक्षा पृष्ठभागावरील समानता आणि नियंत्रणाची उच्च पातळी देते, ज्यामुळे मॅन्युफॅक्चर्सना अधिक स्वच्छ, अधिक सुसंगत फिनिशिंग मिळवणे शक्य होते.

एकसमान जाडी आणि कडक नियंत्रित पृष्ठभागाच्या गुणवत्तेसह उत्कृष्ट अचूकतेने- घडवलेल्या सब्सट्रेट्सवर बांधलेले, ‘एएम/एनएस ऑप्टिमा’ स्टील अंदाज केल्याप्रमाणे वाकते, दृश्यमान सुसंगतीसह फिनिशेस देते आणि उत्पादनामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करते. हे उत्पादकांना अत्यंत विशुद्ध, अचूक आणि निर्दोष पृष्ठभाग तयार करण्यास सक्षम करते जे सर्वात नेमकी ॲप्लिकेशन्स पूर्ण करतात. हे एसी आउटडोअर युनिट्स, पॅनेल्स आणि क्लीनरूम इंस्टॉलेशन्ससह अनेक ॲप्लिकेशन्ससाठी योग्य आहे.

निर्दोष फिनिशेस देणाऱ्या आणि डिझाइन-आधारित स्पेसेसना पूरक असलेल्या अप्लायन्सेसना वाढती मागणी असल्यामुळे भारतातील ग्राहकोपयोगी वस्तूंची बाजारपेठ – आर्थिक वर्ष 27 पर्यंत जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ बनणे अपेक्षित असून ती- वेगाने प्रीमियम होत आहे.

देशातील सर्वात महागडी घरे मुंबईत! 100 कोटी किमतीचे फ्लॅटची सहज होतेय विक्री

भारतात कोटेड स्टीलची वार्षिक मागणी – सध्या 11.1 दशलक्ष टन आहे – येत्या काही वर्षांमध्ये 8–10% सीएजीआर ने वाढण्याचा अंदाज आहे. विशेषतः अप्लायन्स क्षेत्रात, ग्राहकांच्या वाढत्या आकांक्षा, जलद शहरीकरण, प्रीमियमीकरणाचा वेग आणि ‘प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव’ (पीएलआय) स्कीम आणि आयात प्रतिस्थापन प्रयत्नांसारख्या सहाय्यक राष्ट्रीय उपक्रमांमुळे कोटेड स्टीलचा वापर दरवर्षी सुमारे 10% नी वाढत आहे.

2030 पर्यंत इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्समधून कोटेड स्टीलची मागणी 8–12% सीएजीआर ने वाढण्याचा अंदाज आहे, ज्याला पीएलआय चालविणारी सरकारी धोरणे, स्वावलंबन उपक्रम आणि ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजिनीयरिंग क्षेत्रांच्या विस्ताराचे पाठबळ आहे.

अप्लायन्स आणि इंडस्ट्रियल क्षेत्रे, एकत्रितपणे, भारताच्या दीर्घकालीन विकासाच्या मार्गात कोटेड स्टीलचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करतात आणि देशाच्या उत्पादन महत्वाकांक्षांना बळकटी देण्यासाठी उच्च दर्जाच्या मूल्यवर्धित स्टीलची महत्त्वपूर्ण भूमिका सुस्पष्ट करतात.

Web Title: Amns india announces two new premium steels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

आता OTP ची कटकट संपणार! सिम बदलताच बँक खाते होणार ब्लॉक; जाणून घ्या ‘साइलेंट ऑथेंटिकेशन’ आहे तरी काय?
1

आता OTP ची कटकट संपणार! सिम बदलताच बँक खाते होणार ब्लॉक; जाणून घ्या ‘साइलेंट ऑथेंटिकेशन’ आहे तरी काय?

Gold Silver Price Today: सोन्याचांदीच्या दरात प्रचंड घसरण, 12,000 रूपयांंनी गडगडले; 24K, 22K, 18K चा दर
2

Gold Silver Price Today: सोन्याचांदीच्या दरात प्रचंड घसरण, 12,000 रूपयांंनी गडगडले; 24K, 22K, 18K चा दर

RBI Repo Rate: कर्जाचा हप्ता वाढणार की कमी होणार? सामान्यांचे डोळे आरबीआयच्या पतधोरणाकडे! वाचा सविस्तर अहवाल
3

RBI Repo Rate: कर्जाचा हप्ता वाढणार की कमी होणार? सामान्यांचे डोळे आरबीआयच्या पतधोरणाकडे! वाचा सविस्तर अहवाल

आता गोळ्यांच्या स्ट्रिपचे बंधन नसणार; सुट्या गोळ्या विकण्यासाठी सरकार नवीन नियम आणणार
4

आता गोळ्यांच्या स्ट्रिपचे बंधन नसणार; सुट्या गोळ्या विकण्यासाठी सरकार नवीन नियम आणणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.