Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: कशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात? तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला हा सल्ला

Stock Market Update: आज शेअर बाजाराची सुरुवात मंदावण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याशिवाय आज कोणते शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत, याबाबत देखील तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 11, 2025 | 08:53 AM
Stock Market Today: कशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात? तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला हा सल्ला

Stock Market Today: कशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात? तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला हा सल्ला

Follow Us
Close
Follow Us:

जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज ११ जून रोजी बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० यांची सुरुवात मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज गुंतवणूकदारांना शेअर्सची खरेदी करताना आणि विक्री करताना सावध राहावं लागणार आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात.

Todays Gold-Silver Price: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले! चांदीच्या भावात वाढ, वाचा आजच्या किंमती

मंगळवारी, १० जून रोजी देशांतर्गत शेअर बाजार स्थिर राहिला. सेन्सेक्स ५३.४९ अंकांनी म्हणजेच ०.०६% ने घसरून ८२,३९१.७२ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १.०५ अंकांनी वाढून २५,१०४.२५ वर बंद झाला. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप निर्देशांकांमध्ये सतत वाढ होत असतानाही, मंगळवारी प्रमुख बेंचमार्क निर्देशांक स्थिर राहिले. १० जून रोजी बँक निफ्टी निर्देशांक २१०.५० अंकांनी किंवा ०.३७% ने घसरून ५६,६२९.१० वर बंद झाला. निफ्टीमध्ये ग्रासिम, टेक महिंद्रा आणि डॉ. रेड्डी हे प्रमुख वाढत्या कंपन्यांमध्ये होते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

स्टॉक मार्केट टुडेचे सह-संस्थापक व्हीएलए अंबाला यांनी सांगितलं आहे की, बँक निफ्टीला आजच्या सत्रात ५६,५०० – ५६,०३० च्या आसपास आधार मिळू शकतो आणि ५७,३५० आणि ५७,७०० च्या जवळील प्रतिकाराचा सामना करावा लागू शकतो. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार कोणत्या स्टॉकवर लक्ष केंद्रित करू शकतात, याबाबत तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, मारुती सुझुकी, आयआयएफएल फायनान्स, बँक ऑफ बडोदा, केन्स टेक्नॉलॉजी, टेक्समॅको, मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस, इंडिगो, विप्रो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, क्रेडिटअ‍ॅक्सेस ग्रामीण हे शेअर्स आज गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

बाजार तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केल्या जाणाऱ्या शेअर्ससाठी नेटवर्क १८, सुझलॉन एनर्जी, ऑलकार्गो गती, फिलेटेक्स इंडिया आणि ऑटोलाइन इंडस्ट्रीज यांची शिफारस केली आहे. आज निफ्टी ५० च्या भविष्याविषयी बोलताना प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी सांगितलं आहे की, निफ्टी ५० निर्देशांकात पुन्हा एकदा मंदीचे सत्र दिसून आले. निर्देशांक २५,००० क्षेत्राच्या वर स्थिरावला आहे आणि टिकून राहिला आहे. बँक निफ्टी निर्देशांक, मजबूत तेजीनंतर, गेल्या दोन सत्रांपासून हळूहळू घसरत आहे.

WWDC 2025: iPhone ची Android सोबत पुन्हा स्पर्धा, गुगलने तीन वर्षांपूर्वीच सादर केलेलं फीचर Apple युजर्ससाठी केलं लाँच

आज खरेदी करायच्या स्टॉकबद्दल, वैशाली पारेख यांनी नेटवर्क 18, नेल्को आणि झायडस लाईफसायन्सेस या तीन स्टॉक्सची खरेदी किंवा विक्रीसाठी शिफारस केली आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया , टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन , बँको प्रॉडक्ट्स (इंडिया), डेटा पॅटर्न (इंडिया) आणि अलाइड ब्लेंडर अँड डिस्टिलर या स्टॉक्सची खरेदीसाठी शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. नवराष्ट्र कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 11 june 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 08:53 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

SBI News: सुट्ट्यांचा परिणाम शेअर बाजारावर, ‘या’ टॉप कंपन्यांना ३५ हजार कोटींचा फटका
1

SBI News: सुट्ट्यांचा परिणाम शेअर बाजारावर, ‘या’ टॉप कंपन्यांना ३५ हजार कोटींचा फटका

Stock Market Today: मार्केट ओपनिंग अलर्ट! आज शेअर बाजारात सकारात्मक संकेत, गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला
2

Stock Market Today: मार्केट ओपनिंग अलर्ट! आज शेअर बाजारात सकारात्मक संकेत, गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला

SIP Mutual Funds: बाजारातील अस्थिरतेतही SIP वर गुंतवणूकदारांचा वाढला विश्वास; केला ३ लाख कोटींचा टप्पा पार
3

SIP Mutual Funds: बाजारातील अस्थिरतेतही SIP वर गुंतवणूकदारांचा वाढला विश्वास; केला ३ लाख कोटींचा टप्पा पार

Stock Market Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीसह आज करा ‘या’ शेअर्सची खरेदी, बाजार तज्ज्ञ सुमीत बगडिया यांनी केली शिफारस
4

Stock Market Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीसह आज करा ‘या’ शेअर्सची खरेदी, बाजार तज्ज्ञ सुमीत बगडिया यांनी केली शिफारस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.