Stock Market Today: आठवड्याच्या शेवटी शेअर बाजारात घसरणीचे संकेत, गुंतवणूकदारांनो सावध राहा
Stock Market Marathi News: 13 जून रोजी आज आठवड्याच्या शेवटी शेअर बाजार कसा असणार, बाजारात तेजी असणार का, गुंतवणूकदारांना फायदा होणार का, या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखात मिळणार आहे. आज शेअर बाजारात काय परिस्थिती असणार आहे, निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये वाढ होणार की घसरण, याबाबत तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे सविस्तर जाणून घेऊया.
भारतीय शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण झाली असल्याचं पाहायला मिळाली. मध्य पूर्वेत सुरु असलेल्या भू-राजकीय तणाव आणि अमेरिका-चीन व्यापार करार या कारणांमुळे गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली असल्याचं सांगितलं जात आहे. काल झालेल्या घसरणीचा परिणाम आज देखील होणार का, आज शेअर बाजारात काय परिस्थिती असणार आहे, याबद्दल आता जाणून घेऊया. मेहता इक्विटीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तपासे यांनी सांगितलं आहे की, अनेक घटकांमुळे काल शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. यामध्ये इराणवर इस्रायलच्या हल्ल्याची भीती आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून नवीन टॅरिफ धोक्याची भीती यांचा समावेश आहे. या भितीमुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री करण्यास सुरुवात केली आणि बाजारात घसरण सुरु झाली. (फोटो सौजन्य: Pinterest)
गुरुवारी, देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, बेंचमार्क निफ्टी ५० २४,९०० च्या पातळीच्या खाली आला. सेन्सेक्स ८२३.१६ अंकांनी किंवा १.००% ने घसरून ८१,६९१.९८ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २५३.२० अंकांनी किंवा १.०१% ने घसरून २४,८८८.२० वर बंद झाला. या सर्वाचा विचार करता आज शुक्रवारी शेअर बाजाराची सुरुवात मंदावण्याची शक्यता आहे. आज शुक्रवारी 13 जून रोजी निफ्टी आणि सेन्सेक्स घसरणीसह उघडतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
स्टरलाइट टेक्नॉलॉजीज, मनाली पेट्रोकेमिकल्स, सीआयएफएल आणि इमॅजिकावर्ल्ड एंटरटेनमेंट हे स्टॉक्स खरेदी करण्याची तज्ज्ञांनी शिफारस केली आहे. MOFSL चे डेरिव्हेटिव्ह्ज आणि टेक्निकल्स, वेल्थ मॅनेजमेंटचे प्रमुख चंदन तपारिया यांनी आज गुंतवणूकदारांना एसआरएफ , एमफासिस आणि आरबीएल बँकेचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
WWDC 2025: Apple CarPlay साठी लाँच केले 3 नवीन फीचर्स, लाईव्ह अॅक्टिव्हिटीजसह होणार हे मोठे बदल
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना स्टरलाइट टेक्नॉलॉजीज, बीएसई आणि स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी हे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय टोरेंट पॉवर, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, डीसीएम श्रीराम, जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स, एचसीएल टेक, एनटीपीसी, कॅनरा बँक, सीएसबी बँक, कॅप्री ग्लोबल कॅपिटल हे शेअर्स आज गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.