WWDC 2025: Apple CarPlay साठी लाँच केले 3 नवीन फीचर्स, लाईव्ह अॅक्टिव्हिटीजसह होणार हे मोठे बदल
दिग्गज टेक्नोलॉजी कंपनी अॅपलच्या टेक इव्हेंट वर्ल्डवाइड डेवलपर्स कॉन्फ्रेंस 2025 ला 9 जूनपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत कंपनीने या ईव्हेंटमध्ये अनेक अपडेट्स सादर केले आहे. आयफोन्स आणि अॅपल वॉच वापरणाऱ्या युजर्सचा अनुभव आता पूर्णपणे बदलणार आहे. नवीन अपडेट्ससह युजर्स आता अधिक चांगल्या पद्धतीने अॅपल डिव्हाईसचा वापर करू शकणार आहेत.
वर्ल्डवाइड डेवलपर्स कॉन्फ्रेंस 2025 मध्ये iOS 26 लाँच करत कंपनीने अनेक प्रोडक्ट्समध्ये बदल केले आहेत. केवळ आयफोन्स आणि अॅपल वॉचच नाही तर कंपनीने त्यांच्या आणखी एका डिव्हाईससाठी नवीन फीचर्स जारी केले आहेत. वर्ल्डवाइड डेवलपर्स कॉन्फ्रेंसमध्ये कंपनीने इन-कार कनेक्टिविटी सिस्टम अॅपल कारप्लेसाठी अनेक मोठे अपडेट्स जारी केले आहेत, ज्यामुळे युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. अॅपल कारप्लेसाठी कंपनीने 3 फीचर्स लाँच केले आहेत. कंपनीचा असा दावा आहे की, या फीचर्समुळे ड्रायव्हिंग आरामदायी होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
iOS 26 सह अॅपल कारप्लेमध्ये तीन नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये विजेट्स, लाईव्ह एक्टिविटीज आणि टॅपबॅक रिस्पॉन्स यांचा समावेश आहे. आता युजर्स त्यांच्या आवडत्या चॅट्सला iMessage (आईमॅसेज) प्रमाणे पिन करू शकणार आहेत, ज्यामुळे हे चॅट्स वारंवार शोधण्याची गरज लागणार नाही.
आणखी एक कामाचं अपडेट म्हणजे आता कॉल आल्यानंतर संपूर्ण स्क्रिन झाकली जाणार नाही. तुम्हाला स्क्रिनच्या खालील बाजूस कॉलचे एक छोटे नोटिफिकेशन पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे फंक्शन्सवर कोणताही परिणाम होणार नाही. जेव्हा तुम्ही ट्रॅफिक जंक्शनवर गाडी चालवत असाल अशावेळी हे फीचर फायद्याचं ठरणार आहे. कारण आता कॉलमुळे नकाशा बंद होणार नाही.
iOS 26 सह अॅपल कारप्लेचे डिझाइन देखील पूर्णपणे बदलण्यात आलं आहे. यांमध्ये आता लिक्विड ग्लास डिस्प्लेअंतर्गत ट्रांसपेरेंट स्टाइलिंग दिली जाणार आहे. लाइट आणि डार्क मोडमध्ये आयकॉन्सचा लुक देखील बदलणार आहे. आता नोटिफिकेशन पूर्वीपेक्षा अधिक कॉम्पॅक्ट दिसणार आहेत. ज्यामुळे नेविगेशनसाठी दिशा-निर्देश पाहणे अधिक सोपं होणार आहे.
WWDC 2025: iPhone बनणार आता सुपरफास्ट, हे आहेत iOS 26 चे टॉप 7 फीचर्स! वाचा सविस्तर
अॅपलने देखील पुष्टी केली आहे की त्यांचे नवीन कारप्ले अल्टा वैशिष्ट्य, जे गेल्या महिन्यात पहिल्यांदा अॅस्टन मार्टिन डीबीएक्स ७०७ वर दिसले होते, ते अधिक वाहनांवर उपलब्ध करून दिले जाईल. रिपोर्ट्सनुसार, ह्युंदाई, किआ, फोर्ड, व्होल्वो सारख्या ऑटो कंपन्या त्यांच्या मॉडेल्समध्ये कारप्ले अल्ट्रा इंटीग्रेट करण्यासाठी आधीच अॅपलसोबत काम करत आहेत.