Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: बाजारात आज तेजी राहण्याचे संकेत, हे शेअर्स गुंतवणूकदारांचे नशिब बदलण्याची शक्यता; काय म्हणाले तज्ज्ञ?

Stock Market Update: 2 जून रोजी घसरणीने झालेल्या सुरुवातीनंतर आजा शेअर बाजारात आज तेजी राहण्याते संकेत वर्तवण्यात आले आहेत. आज कोणते शेअर्स गुंतवणूकदारांचे नशिब बदलणार, याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 03, 2025 | 08:56 AM
Stock Market Today: बाजारात आज तेजी राहण्याचे संकेत, हे शेअर्स गुंतवणूकदारांचे नशिब बदलण्याची शक्यता; काय म्हणाले तज्ज्ञ?

Stock Market Today: बाजारात आज तेजी राहण्याचे संकेत, हे शेअर्स गुंतवणूकदारांचे नशिब बदलण्याची शक्यता; काय म्हणाले तज्ज्ञ?

Follow Us
Follow Us:

जागतिक बाजारातील संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, वर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. काल शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली होती. मात्र आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सोमवारी २ जून रोजी सेन्सेक्स ७७.२६ अंकांनी म्हणजेच ०.०९% ने घसरून ८१,३७३.७५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३४.१० अंकांनी म्हणजेच ०.१४% ने घसरून २४,७१६.६० वर बंद झाला.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किंमतीत झाली वाढ, चांदीनेही पार केला लाखोंचा टप्पा

भारतीय बाजारांसाठी आज चांगले संकेत देण्यात आले आहेत. निफ्टी सुमारे ५० अंकांनी वाढ दर्शवत आहे. आशियामध्येही तेजी दिसून येत आहे. गुंतवणूकदार आज युनायटेड स्पिरिट्स , हॅरिसन्स मल्याळम आणि ल्युपिन या तीन स्टॉक्सच्या खरेदी आणि विक्रीबाबत विचार करू शकतात. पुढील काही सत्रांमध्ये निफ्टीमध्ये वाढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

इंटेलेक्ट डिझाइन अरेना लिमिटेड, व्हॅलर इस्टेट लिमिटेड (डीब्रेल्टी), भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, ओबेरॉय रिअ‍ॅलिटी लिमिटेड, सोना बीएलडब्ल्यू प्रेसिजन फोर्जिंग्ज लिमिटेड, फेडरल बँक लिमिटेड, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड या स्टॉक्सच्या खरेदीबाबत आज गुंतवकणूकदार विचार करू शकतात. कारण तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, हे शेअर्स आज तेजीत राहण्याची शक्यता आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड किंवा भेल हे स्टॉक्स देखील आज गुंतवणूकदारांना चांगली कमाई करण्याची संधी देण्याची शक्यता आहे.

१०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याऱ्या स्टॉक्समध्ये आज इंडियन ओव्हरसीज बँक, ओला इलेक्ट्रिक, येस बँक, टीटीएमएल, पीएसबी आणि सिगाची इंडस्ट्रीज यांचा विचार केला जाऊ शकतो. खरं तर रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे आणि पुन्हा एकदा टॅरिफ युद्धाच्या चिंतेमुळे जागतिक बाजारपेठा मंदावल्या आहेत.

आता चॅटिंग होणार आणखी मजेदार! Elon Musk ने लाँच केला XChat, फोन नंबरशिवाय कॉलिंग आणि जबरदस्त सिक्योरिटी फीचर्सने सुसज्ज

सोमवारी निफ्टी ५० जवळजवळ ३४ अंकांनी घसरून २४७१६ वर बंद झाला, तर बीएसई सेन्सेक्स ८१३७३ अंकांनी किंचित घसरून बंद झाला. निफ्टी पीएसयू बँक, एफएमसीजी, ऑटो, रिअल्टी, फार्मा हे शेअर्स तेजीत होते. मंगळवार, ३ जून रोजी शेअर बाजार किंचित वाढून उघडण्याची अपेक्षा आहे, गुंतवणूकदार जागतिक घडामोडींवर आणि रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आगामी व्याजदर निर्णयावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सकाळी ८:१५ वाजता, गिफ्ट निफ्टी फ्युचर्स २४,८४५.५ वर व्यवहार करत होते.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 3 june 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 08:56 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Crash : गुंतवणूकदारांना फुटला घाम… सलग 7 आठवड्यांपासून घसरण सुरुच; मार्केटमध्ये नक्की घडतंय काय?
1

Share Market Crash : गुंतवणूकदारांना फुटला घाम… सलग 7 आठवड्यांपासून घसरण सुरुच; मार्केटमध्ये नक्की घडतंय काय?

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?
2

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट
3

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO
4

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.