Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच बाजारात होणार घसरण? तज्ज्ञांनी काय सांगितलं? जाणून घ्या

Share Market Update: गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, आज आठवड्याची सुरुवात घसरणीने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आज काळजी घेतली पाहिजे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 07, 2025 | 09:00 AM
Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच बाजारात होणार घसरण? तज्ज्ञांनी काय सांगितलं? जाणून घ्या

Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच बाजारात होणार घसरण? तज्ज्ञांनी काय सांगितलं? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

७ जुलै रोजी आज शेअर बाजार सुरु राहणार आहे. ७ जुलै रोजी मोहरमचा १० वा दिवस साजरा केला जाणार होता, त्यामुळे आज शेअर बाजार बंद राहणार असल्याची अपडेट काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. मात्र या वर्षी मोहरमचा १० वा दिवस, आशुरा, ६ जुलै रोजी साजरा करण्यात आला. त्यामुळे बँका, सरकारी कार्यालये, पोस्ट ऑफिस, शाळा आणि इतर सार्वजनिक संस्था ७ जुलै रोजी खुल्या राहतील. ७ जुलै रोजी सार्वजनिक सुट्टी नसल्याने, शेअर बाजार देखील मोहरमच्या दिवशी खुले राहतील आणि नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू ठेवतील.’

Flipkart GOAT सेलपूर्वीच पडली Samsung Galaxy S24 Ultra ची किंमत! असा घ्या डिस्काऊंट आणि ऑफरचा फायदा

आठवड्याच्या सुरुवातीला आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर आकारणीवरील गोंधळामुळे जागतिक बाजारातील कमकुवत संकेत लक्षात घेता, सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीने उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सपाट सुरुवात दर्शवितात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

शुक्रवारी, देशांतर्गत शेअर बाजाराने दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लावला आणि उच्चांक गाठला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,४०० च्या वर राहिला. सेन्सेक्स १९३.४२ अंकांनी म्हणजेच ०.२३% ने वाढून ८३,४३२.८९ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ५५.७० अंकांनी म्हणजेच ०.२२% ने वाढून २५,४६१.०० वर बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक २३९.९५ अंकांनी म्हणजेच ०.४२% ने वाढून ५७,०३१.९० वर बंद झाला. यानंतर आज आठवड्याची सुरुवात कशी होणार आहे आणि गुंतवूकदारांसाठी कोणते शेअर्स महत्त्वाचे ठरणार आहेत, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 7 जुलै रोजी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने होणार असल्याचा अंदाज आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर आकारणीवरील गोंधळामुळे घसरणीसह सुरुवात होण्याची शक्यता आहे. इंडसइंड बँक, टाटा स्टील, रेल विकास निगम लिमिटेड, श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी, अल्ट्राटेक सिमेंट, डाबर इंडिया, ज्योती सीएनसी ऑटोमेशन, सेन्को गोल्ड, बीईएमएल, आयडीबीआय बँक हे शेअर्स आज गुंतवणूकदारांचं नशिब बदलण्याची शक्यता आहे.

शॉपिंगसाठी तयार आहात ना! या दिवशी सुरु होतोय Amazon प्राइम डे सेल, Top Deals चा झाला खुलासा

प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना सालासर टेक्नो इंजिनिअरिंग , वेल्सपन लिव्हिंग आणि इन्फोसिस हे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आज १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करणाऱ्या सहा इंट्राडे स्टॉकमध्ये पीसी ज्वेलर , सूर्य लक्ष्मी कॉटन मिल्स, सालासर टेक्नो इंजिनिअरिंग , ट्रायडंट , एबीएफआरएल आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांची शिफारस करण्यात आली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 7 july 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

6 महिन्यात 4 शेअर्सचा बोलबाला, गुंतवणूकदार झाले मालामाल, तब्बल 298% परतावा; आताच पहा यादी आणि गुंतवा पैसे
1

6 महिन्यात 4 शेअर्सचा बोलबाला, गुंतवणूकदार झाले मालामाल, तब्बल 298% परतावा; आताच पहा यादी आणि गुंतवा पैसे

Share Market Today: आदित्य इन्फोटेकसह या शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळणार जबरदस्त रिटर्न! तज्ज्ञांचा दमदार सल्ला
2

Share Market Today: आदित्य इन्फोटेकसह या शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळणार जबरदस्त रिटर्न! तज्ज्ञांचा दमदार सल्ला

Adani Power Share : अदानींच्या ‘या’ कंपनीचे शेअर्स करू शकतात मालामाल! तुमचीही गुंतवणूक आहे का?
3

Adani Power Share : अदानींच्या ‘या’ कंपनीचे शेअर्स करू शकतात मालामाल! तुमचीही गुंतवणूक आहे का?

Share Market Holiday: गुरुनानक जयंतीला बाजार राहणार का बंद? कधी असणार सुट्टी
4

Share Market Holiday: गुरुनानक जयंतीला बाजार राहणार का बंद? कधी असणार सुट्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.