ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने प्राईम डे 2025 ची घोषणा केली आहे. हा सेल 12 जुलैपासून सुरु होणार आहे. या सेलमध्ये गॅझेट्सापासून घरगुती वस्तूंपर्यंत अनेक गोष्टींवर डिस्काऊंट दिलं जाणार आहे. ज्यामुळे प्राईम मेंबर्सना अतिशय कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या सेलमध्ये अनेक आकर्षक डिल्स असणार आहे. याशिवाय काही खास ऑफर्स देखील उपलब्ध असणार आहे. तुम्ही नवीन स्मार्टफोन किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे.
अॅमेझॉनच्या Prime Day 2025 सेलमध्ये स्मार्टफोनवर तगड्या डील्स ऑफर केल्या जाणार आहे. यावर्षी अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत, आता हे स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी प्राईम मेंबर्सना मिळणार आहे. सेलमध्ये प्राईम मेंबर्स Samsung Galaxy M36 5G, हॉनर X9c 5G, OPPO Reno14 Series, लावा स्टॉर्म लाइट 5G, OnePlus Nord 5, OnePlus Nord CE5, iQOO Z10 Lite 5G, realme Narzo 80 Lite 5G आणि iQOO 13 हे स्मार्टफोन्स आकर्षक डिस्काऊंट आणि ऑफर्ससह खरेदी करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
केवळ नव्या स्मार्टफोन्सवरच नाही तर कंपनी जुन्या स्मार्टफोन्सवर देखील आकर्षक डिस्काऊंट ऑफर करणार आहे. सेलमध्ये सॅमसंगचा Galaxy S24 Ultra 5G, iPhone 15, OnePlus 13s आणि iQOO Neo 10R देखील अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहक स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळवू शकतो. याशिवाय काही स्मार्टफोन्सवर 60 हजार रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफर, इंस्टेंट बँक डिस्काउंट आणि 24 महीन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI ऑप्शन देखील मिळणार आहेत.
या डीलला आणखी जबरदस्त करण्यासाठी, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अतिरिक्त बँक ऑफर्स देऊ शकते. प्राइम सदस्यांना आयसीआयसीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड, एसबीआय क्रेडिट कार्ड किंवा ईएमआय पर्यायासह या बँकांच्या कार्डवर 10% पर्यंत सूट मिळू शकते. ज्यामुळे स्मार्टफोन्स आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
प्राईम डे सेलमध्ये केवळ स्मार्टफोन्सच नाही तर इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर देखील आकर्षक डिस्काऊंट आणि ऑफर उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये हेडफोन, वियरेबल्स, स्पीकर आणि स्मार्ट डिव्हाईससह अनेक स्मार्टफोन्स कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. काही डिव्हाइसेसवर 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. सेलमध्ये कॅमेरे देखील सवलतीत उपलब्ध असतील, ज्यामध्ये सोनी, डीजेआय, गोप्रो आणि Insta360 सारखे टॉप ब्रँड 50 टक्क्यांपर्यंत सूट देत आहेत.