Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीला कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात? कोणते स्टॉक्स गुंतवणूकदारांचं नशीब बदलणार?

Stock Market Update: आठवड्याची सुरुवात कशी होणार आहे? शेअर बाजारात कोणते स्टॉक्स वाढणार आणि कोणते घसरणार आहे? तज्ज्ञांनी आजच्या शेअर बाजाराबाबत काय सांगितलं आहे, सर्वकाही जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 09, 2025 | 09:02 AM
Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीला कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात? कोणते स्टॉक्स गुंतवणूकदारांचं नशीब बदलणार?

Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीला कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात? कोणते स्टॉक्स गुंतवणूकदारांचं नशीब बदलणार?

Follow Us
Close
Follow Us:

जागतिक बाजारातील उत्साहवर्धक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज ९ जून रोजी सोमवारी तेजीत उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक ८१७.५५ अंकांनी म्हणजेच १.४७% ने वाढून ५६,५७८.४० वर बंद झाला, तर आठवड्याचा शेवट १.४९% वाढीसह झाला.

WWDC 2025: तयार आहात ना! उद्यापासून सुरु होतोय Apple ईव्हेंट, iOS 26 पासून Apple इंटेलिजेंसपर्यंत काय असणार खास? जाणून घ्या

शुक्रवारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दर ५० बेसिस पॉइंट्स (bps) ने ५.५०% पर्यंत कमी केल्यानंतर आणि कॅश रिझर्व्ह बँक (CRR) १०० bps ने ३% पर्यंत कमी केल्यानंतर, देशांतर्गत शेअर बाजाराने उच्चांक गाठला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,००० च्या पातळीच्या वर बंद झाला. जोपर्यंत सेन्सेक्स ८१,६०० या पातळीच्या वर राहील, तोपर्यंत शेअर बाजारात तेजी राहण्याची अपेक्षा ठेवली जाऊ शकते. मात्र याउलट, जर सेन्सेक्स ८१,६०० च्या खाली गेला तर घसरण वाढू शकते, ज्यामुळे सेन्सेक्स ८०,२०० पर्यंत खाली येऊ शकतो.  (फोटो सौजन्य – Pinterest)

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार एचडीएफसी बँक, सुझलॉन एनर्जी, अंबुजा सिमेंट्स, टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स या स्टॉकवर आज लक्ष केंद्रित करू शकतात. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना गो डिजिट जनरल इन्शुरन्स, गोदरेज प्रॉपर्टीज , आदित्य बिर्ला रिअल इस्टेट, गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि यूटीआय अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी हे पाच शेअर्स खरेदी करण्यासाठी शिफारस केली आहे.

स्टारलिंकला भारतात मंजूरी देण्यामागचं कारण आलं समोर, खेडेगावातील नागरिकांना होणार फायदा! जाणून घ्या सविस्तर

१०० पेक्षा कमी किमतीत गुंवकणूकदार सहा इंट्राडे स्टॉक खरेदी करू शकतात, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. या इंट्राडे स्टॉक्समध्ये आयडीएफसी फर्स्ट बँक , एचएफसीएल, कॉन्फिडन्स पेट्रोलियम, धनी सर्व्हिसेस , जीएमआर एअरपोर्ट आणि एनएचपीसी यांचा समावेश आहे. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांचा असा विश्वास आहे की शुक्रवारी झालेल्या तीव्र तेजीनंतर येत्या काही दिवसांत निफ्टी ५० आणि बँक निफ्टी दोन्हीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वैशाली पारेख यांनी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स, वेदांत आणि बंधन बँक हे तीन स्टॉक खरेदी करण्याची शिफारस गुंतवणूकदारांना केली आहे.

अमेरिका आणि चीन व्यापार वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत असल्याने सोमवारी आशियाई शेअर बाजारांनी तेजी दर्शविली. सुरुवातीच्या व्यापारात कोस्पी आणि हँग सेंग १.५ टक्क्यांनी वधारले, तर निक्केई १ टक्क्यांनी वधारले. सोमवारी सर्व प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलर स्थिर राहिला.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. नवराष्ट्र कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 9 june 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 09:02 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: इंडियन ऑईलसह आज खरेदी करा हे शेअर्स, तज्ज्ञांनी केली शिफारस; तुम्हीही होऊ शकता मालामाल
1

Share Market Today: इंडियन ऑईलसह आज खरेदी करा हे शेअर्स, तज्ज्ञांनी केली शिफारस; तुम्हीही होऊ शकता मालामाल

नफ्यात तुफान वाढ, शेअरहोल्डर्सना मोठी भेट! रू. 24 चा शेअर मिळणार रू50 चा लाभांश
2

नफ्यात तुफान वाढ, शेअरहोल्डर्सना मोठी भेट! रू. 24 चा शेअर मिळणार रू50 चा लाभांश

Share Market Today: हे स्टॉक्स बदलू शकतात तुमचं नशिब, तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला! जाणून घ्या सविस्तर
3

Share Market Today: हे स्टॉक्स बदलू शकतात तुमचं नशिब, तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला! जाणून घ्या सविस्तर

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या
4

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.