WWDC 2025: तयार आहात ना! उद्यापासून सुरु होतोय Apple ईव्हेंट, iOS 26 पासून Apple इंटेलिजेंसपर्यंत काय असणार खास? जाणून घ्या
Apple चा WWDC 2025 ईव्हेंट उद्यापासून म्हणजेच 9 जूनपासून सुरु होणार आहे. WWDC म्हणजेच वर्ल्डवाईड डेवलपर्स कॉन्फरन्स. या ईव्हेंटमध्ये सॉफ्टवेयर आणि हार्डवेयरबाबत अनेक घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. iPhone, iPad, Apple Watch आणि macOS डिव्हाईससाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टमची घोषणा देखील केली जाऊ शकते.
Apple ने नुकतेच WWDC 2025 ईव्हेंटबाबत माहिती शेअर केली आहे. हा ईव्हेंट 9 जून रोजी सकाळी 10 वाजता PDT होईल, म्हणजेच भारतात तुम्ही हा ईव्हेंट रात्री 10.30 वाजता पाहू शकता. यानंतर दुपारी 1 वाजता PDT म्हणजेच भारतीय वेळेनुसार 1.30 वाजता प्लॅटफॉर्मवर डेव्हलपर्ससाठी नवीन काय आहे याची तांत्रिक माहिती देईल. हा ईव्हेंट जागतिक स्तरावर लाइवस्ट्रीम केला जाईल. युजर्स हा ईव्हेंट Apple च्या अधिकृत वेबसाइट, Apple TV अॅप किंवा कंपनीच्या YouTube चॅनेलद्वारे पाहू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
यावेळी कंपनी WWDC 2025 मध्ये त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टमचे नाव बदलण्याची शक्यता आहे. iOS 26 ला iOS 19 अपडेटच्या जागी सादर केलं जाऊ शकतं. या बदलामुळे iOS वर्जन कॅलेंडर वर्षासह सेट होईल, ज्यामुळे iOS 27, 28 आणि त्यानंतरच्या रिलीझसाठी युजर्समधील गोंधळ दूर होईल. Apple च्या सॉफ्टवेयर विकासाच्या दृष्टिकोणातून हा बदल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
यावेळी आपल्या नवीन OS अपडेटसह Apple त्यांच्या सर्व डिव्हाईसचा लूक बदलण्याची तयारी करत आहे. नवीन अपडेटमध्ये युजर्सना नवीन आयकॉन मिळणार आहेत. कंपनी पूर्ण ऑपरेटिंग सिस्टमला रीडिझाईन करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी नवीन OS ला Vision OS Pro सारख्या ऑपरेटिंग सिस्टमप्रमाणे डिझाईन करण्याचा प्रयत्न करत आहे.
Apple गेमिंग अनुभवात सुधारणा करण्यासाठी सज्ज आहे. यावेळी जुन्या गेम सेंटरला हटवून कंपनी त्याच्याजागी एक नवीन आणि प्री-इंस्टॉल केलेले गेमिंग अॅप वापरू शकते. हा बदल iPhone, iPad, Mac आणि Apple TV वर उपलब्ध होणार आहे.
Nothing Phone 3 बाबत समोर आली नवीन अपडेट, असा असणार स्मार्टफोनचा रियर पॅनल! फोनला मिळणार नवा लूक
अहवालात म्हटले आहे की डेव्हलपर्सना लवकरच एक नवीन टूलकिट दिलं जाणार आहे. यामुळे डेव्हलपर्स अॅपलचे स्वतःचे एआय मॉडेल थर्ड-पार्टी अॅप्समध्ये जोडू शकणार आहेत. याचा फायदा आयफोन युजर्सना होणार आहे. कारण यामुळे अॅप्सची एआय पॉवर आणखी वाढणार आहे. याशिवाय युजर्सना जबरदस्त फीचर्स देखील मिळणार आहेत.
2025 मध्ये आधीच कंपनीने नवीन MacBook Air M4, iPad Air M3 आणि iPhone 16e मॉडेल सादर केले आहेत. रिपोर्ट्सनुसार, एक रिफ्रेश्ड Mac Pro देखील सादर केलं जाऊ शकतं.