Share Market Today: गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने दिले संकेत, सकारात्मक पातळीवर उघडणार बाजार; इन्फोसिससह खरेदी करा हे स्टॉक्स
८ सप्टेंबर रोजी शेअर बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. काल शेअर बाजाराची सुरुवात देखील सकारात्मक झाली होती. तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, आज ९ सप्टेंबर रोजी देखील शेअर बाजार सकारात्मक पातळीवर उघडणार आहे. जागतिक बाजारातील उत्साहवर्धक संकेतांमुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे.
Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्याच्या दरात पुन्हा झाली घसरण, चांदीचे भावही नरमले
गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९४० च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ४७ अंकांनी जास्त होता. आशियाई बाजारांमध्ये तेजी दिसून आली, तर अमेरिकन शेअर बाजार रात्रभर वाढीसह बंद झाला, फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा वाढल्याने नॅस्डॅकने विक्रमी उच्चांक गाठला. (फोटो सौजन्य – Pinterest)
सोमवारी, शेअर बाजार किंचित वाढून बंद झाला, बेंचमार्क निफ्टी ५० २४,७०० च्या वर होता. सेन्सेक्स ७६.५४ अंकांनी म्हणजेच ०.०९% ने वाढून ८०,७८७.३० वर बंद झाला, तर निफ्टी ५० निर्देशांक ३२.१५ अंकांनी म्हणजेच ०.१३% ने वाढून २४,७७३.१५ वर बंद झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ७२.३५ अंकांनी किंवा ०.१३% ने वाढून ५४,१८६.९० वर बंद झाला.
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार इन्फोसिस, स्ट्राइड्स फार्मा, हुडको, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स, कोल इंडिया, टीव्हीएस मोटर, ब्रिगेड एंटरप्रायझेस, रेलटेल कॉर्प, हिरो मोटोकॉर्प, बार्टोनिक्स इंडिया, या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये रॅमको इंडस्ट्रीज, पराग मिल्क फूड्स, नेस्को, पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज आणि स्वराज इंजिन्स यांचा समावेश आहे.
आज खरेदी करायच्या स्टॉकबाबत बाजारातील तज्ञ, चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी सात इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड, टाटा मोटर्स लिमिटेड, दिल्लीवरी लिमिटेड, ग्रॅविटा इंडिया लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, सीआयई ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांचा समावेश आहे.
युजर्सचा ताण होणार कमी, नोकरीमधील वाढते घोटाळे रोखण्यासाठी LinkedIn ने सादर केलं नवं फीचर
प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये आदित्य बिर्ला कॅपिटल, यूपीएल आणि बँको प्रॉडक्ट्स यांचा समावेश आहे. अर्बन कंपनीचा आयपीओ सबस्क्रिप्शन १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत खुला राहील. याचा अर्थ मेनबोर्ड आयपीओ बुधवार ते शुक्रवार बोली लावणाऱ्यांसाठी खुला राहील. कंपनीने अर्बन कंपनीचा आयपीओ किंमत पट्टा ₹ ९८ ते ₹ १०३ प्रति इक्विटी शेअर निश्चित केला आहे.
आज कोणते शेअर्स ठरणार फायदेशीर?
इन्फोसिस, स्ट्राइड्स फार्मा, हुडको, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स, कोल इंडिया, टीव्हीएस मोटर, ब्रिगेड एंटरप्रायझेस, रेलटेल कॉर्प, हिरो मोटोकॉर्प, बार्टोनिक्स इंडिया
सोमवारी कोणते शेअर्स तेजीत होते?
टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि मारुती सुझुकी
सोमवारी कोण्त्या शेअर्समध्ये घसरण झाली?
एशियन पेंट्स, टायटन, कोटक बँक, ट्रेंट आणि सन फार्मा