पुण्यात ह्युंदाईचा प्रकल्प..! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
पुण्यात होणारा ह्युंदाईचा प्लांट महाराष्ट्राच्या विकासाला मोठी गती देईल, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. हा प्लांट महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रवासातील एक मैलाचा दगड आहे. हा प्रकल्प गतिशीलता क्रांती करणारा असून, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियनकडे नेणारा असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे. याबाबत ट्वीट करुन देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
‘मेक इन इंडिया’च्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु
पंतप्रधानांनी औद्योगिक विकासाला सतत प्रोत्साहन दिल्याबद्दल फडणवीसांनी त्यांचे आभार मानले आहेत. एकत्रितपणे, आम्ही ‘विकसित भारत 2047’ च्या दिशेने वाटचाल करत आहोत. ‘मेक इन इंडिया’च्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु असल्याचेही फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
औद्योगिक क्रांतीसंदर्भात संबंधित विषयांवर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ह्युंदाई मोटर ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष, चुंग ईयू-सन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी औद्योगिक क्रांतीसंदर्भात संबंधित विषयांवर चर्चा केली. भारताच्या बाजारपेठेमुळे आणि सुधारणावादी दृष्टिकोनामुळे, ह्युंदाई भारतासोबत काम करण्यास प्राधान्य देते असल्याचे चुंग ईयू-सन यांनी म्हटले आहे.
This is awesome news for Maharashtra !
Hyundai’s Pune plant will accelerate Maharashtra’s growth, even further !Hyundai’s upcoming plant in Pune is a milestone in Maharashtra’s industrial journey and India’s mobility revolution propelling us toward the vision of 1 trillion… https://t.co/BEmlyW2uFN pic.twitter.com/TFriqG3NCm
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 22, 2024
पंतप्रधानांना पुणे येथे आमंत्रण
चुंग ईयू-सन यांनी माननीय पंतप्रधानांना पुणे, महाराष्ट्र येथे ह्युंदाई प्लांटच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले आहे. आम्ही भारत सरकारचे आभारी असल्याचे चुंग ईयू-सन यांनी म्हटले आहे. भारत सरकार या प्लांटशी संबंधित सर्व बाबींसाठी महाराष्ट्राला सहकार्य करेल असेही त्यांनी सांगितले आहे.