Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : एकनाथ खडसेंनी थेट पोलिसांना धमकावलं? गृहमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्यावरुन गुन्हा दाखल

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गृहमंत्री आणि पोलिसांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे .

  • By प्रीति माने
Updated On: Feb 12, 2026 | 01:08 PM
eknath-khadse-controversial-statement on devendra fadnavis case-filed-savda-police-raver-jalgaon

eknath-khadse-controversial-statement on devendra fadnavis case-filed-savda-police-raver-jalgaon

Follow Us
Follow Us:
  • एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल
  • सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
  • गृहमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा
जळगाव : ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे अडचणीमध्ये आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मुख्य म्हणजे हा वाद केवळ स्थानिक कारवाईपुरता मर्यादित न राहता, आता थेट राज्याच्या गृहखात्याशी जोडला गेला आहे.  (Political News)

जळगावमधील सावदा परिसरात वाळू आणि इतर गौण खनिजांची अवैध वाहतूक सुरु होती. याबाबत स्थानिकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी अैवध वाहतूक होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी काही वाहने पकडली होती. या कारवाईत काही निष्पाप लोकांना त्रास दिला जात असल्याचा दावा करत एकनाथ खडसे आक्रमक झाले होते. आपल्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर खडसे थेट सावदा पोलीस स्टेशन गाठले आणि तिथे आक्रमक भूमिका घेतली.

हे देखील वाचा : “तपास यंत्रणा या भाडXXX झाल्यात…! अजित पवारांच्या अपघातावर संजय राऊतांचा चढला पारा

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांसाठी पोलीस स्टेशनमध्ये वाद घातला. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये याबाबत प्रमुख बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षकांशी बोलताना खडसेंनी अरेरावीची भाषा वापरली आणि त्यांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच यावेळी संवादाच्या ओघात खडसेंनी राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह आणि अत्यंत खालच्या पातळीवरची विधाने केली असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण कधी? रोहित पवार आज पुन्हा बोलणार…

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विद्यमान गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. ते म्हणाले की, तुमचे गृहमंत्री काय करतात ते मला माहित आहे, अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. तसेच पोलीस ठाण्यात गर्दी जमवून पोलिसांवर दबाव आणण्याचा आणि त्यांना शासकीय काम करण्यापासून रोखल्याचा आणि सरकारी कामात अडथळा आरोप लावण्यात आला आहे. एकनाथ खडसेंवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने सरकारी नोकराला धमकावणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे आणि मानहानीकारक वक्तव्ये करणे या कलमांचा समावेश आहे.

Web Title: Eknath khadse controversial statement on devendra fadnavis case filed savda police raver jalgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • eknath khadse
  • Jalgaon News

संबंधित बातम्या

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
1

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Jalgaon News: जळगाव पोलिसांचा धडाका! एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त
2

Jalgaon News: जळगाव पोलिसांचा धडाका! एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ
3

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
4

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.