Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 14, 2026 | 10:18 AM
Devendra Fadnavis Revelation, Operation Tiger Maharashtra, Eknath Shinde

Devendra Fadnavis Revelation, Operation Tiger Maharashtra, Eknath Shinde

Follow Us
Follow Us:
  • देवेंद्र फडणवीस आज (14 फेब्रुवारी) पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दोऱ्यावर
  • अजित पवार यांच्या निधनानंतर (२८ जानेवारी २०२६) महाराष्ट्रात राजकीय पोकळी
  • दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात जोरदार चर्चा सुरू
Devendra Fadnavis in Delhi: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (14 फेब्रुवारी) पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दोऱ्यावर गेले आहेत. एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्ली दौरा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नवनिर्वाचित भाजप राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेतल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

अधिकृत माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेले आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हजेरी लावली होती. या दौऱ्यात फडणवीस यांनी भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन (Nitin Nabin) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. २० जानेवारी २०२६ रोजी नितीन नवीन यांनी पदभार स्वीकारला होता, तेव्हा फडणवीस दावोस दौऱ्यावर असल्याने त्यांना उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे ही एक सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे.

‘अजितदादा असते तर विलिनीकरण यशस्वी झाले असते’; खासदार सुप्रिया सुळेंचे विधान

दरम्यान, चार दिवसांपूर्वी फडणवीस यांनी कोणालाही माहिती न देता दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. ही भेट पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर (२८ जानेवारी २०२६) महाराष्ट्रात राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच, फडणवीस यांचे दिल्लीतील वाढते दौरे आगामी मोठ्या राजकीय बदलांचे संकेत मानले जात आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि महायुतीमधील जागावाटपाबाबत या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे दावोस आर्थिक परिषदेसाठी स्वित्झर्लंड दौऱ्यावर असताना नितीन नवीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर फडणवीस यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. पण फडणवीस यांचा हा दौरा गुप्त मानला जात होता. त्यावेळीही नितीन नवीन हे बिहारच्या दौऱ्यावर असल्याने दोघांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे फडणवीस यांनी कालच्या दौऱ्यात आवर्जून नितीन नवीन यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. पण नितीन नवीन यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर फडणवीस त्यांना पहिल्यांदाच भेटले. त्यामुळेही या भेटीत महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत चर्चा झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra Politics news)

बीडला अजित पवार यांचे स्मारक होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील

महत्त्वाची बाब म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत. जर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले तर राजकीय समीकरणे पुन्हा बदलू शकतात. त्यामुळे फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते, फडणवीस हे उगाच दोनदा दिल्लीला जाणारे नेते नाहीत. जेव्हा जेव्हा असे दौरे वाढतात, तेव्हा महाराष्ट्रात काहीतरी मोठे ‘राजकीय स्थित्यंतर’ घडते, असा आजवरचा अनुभव आहे. विशेषतः सुनेत्रा पवार यांचीही लवकरच दिल्लीत अमित शाह यांच्याशी भेट होण्याची शक्यता असल्याने, पुढचे ७२ तास महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक मानले जात आहेत.

 

Web Title: The suspense of fadnavis delhi visit just a goodwill visit or the beginning of a major political earthquake in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
1

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

Maharashtra Breaking News Live Updates Today:  ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच
2

Maharashtra Breaking News Live Updates Today: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण
3

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश
4

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.