Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICICI क्रेडिट कार्डधारकांना झटका! 15 डिसेंबरपासून मोफत सुविधा बंद, खिशावर वाढणार भार

ICICI: आयसीआयसीआय बँकेने आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२६ पासून हे बदल टप्प्याटप्प्याने लागू होणार आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 13, 2026 | 05:11 PM
ICICI Credit Card Rules Change 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

ICICI Credit Card Rules Change 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ११ डिसेंबरपासून कार्ड बदलण्याचे शुल्क २०० वरून ३०० रुपये + GST.
  • १५ डिसेंबरपासून काही कार्डांवरील मोफत विमा आणि मूव्ही तिकिटे बंद.
  • २५ नोव्हेंबरपासून काही बिझनेस कार्डांचे DCC शुल्क ३.५०% होणार.

ICICI Credit Card Rules Change 2026: जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर येत्या काळात तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये आणि सोयीमध्ये बदल करावा लागू शकतो. ICICI बँकेचं क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बँकेने आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बरेच बदल केलेत. कार्ड बदलायला जास्त पैसे लागणार आहेत, काही कार्डांवर मिळणारा फ्री विमा बंद होणार आहे, आणि बऱ्याच लोकांना आता फ्री मूव्हीची तिकिटं पण मिळणार नाहीत.

हे बदल नोव्हेंबर आणि डिसेंबर 2026 मध्ये वेगवेगळ्या तारखांना लागू होतील. पण एक चांगली गोष्ट म्हणजे हे नियम सगळ्याच कार्डांना लागू होणार नाहीत. कोणत्या कार्डवर कोणता फायदा बंद होणार आहे आणि कुठे जास्त पैसे लागणार आहेत, ते नीट समजून घ्या.

कार्ड बदलायला आता किती पैसे लागणार?

आयसीआयसीआय बँकेने क्रेडिट कार्ड बदलण्याच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.आता कार्ड हरवलं, तुटलं, खराब झालं, तर नवीन कार्ड काढायला जास्त पैसे मोजावे लागतील. आत्ता कार्ड बदलायला 200 रुपये + GST लागत होता. पण 11 डिसेंबर 2026 पासून हा खर्च 300 रुपये + GST होणार आहे. सरळ 100 रुपये वाढले. जवळपास 50 टक्के वाढ आहे. 100 रुपये वाटत असले तरी दरवेळी कार्ड हरवलं तर 300 + GST द्यावा लागेल, हे लक्षात ठेवा.

Gokul Milk Price Hike: अमूल-मदर डेअरीनंतर आता गोकुळ दूधही महागणार; दरात २ रुपयांची वाढ होणार?

पण यातून 3 कार्डांना सूट दिलीय. एमराल्ड प्रायव्हेट मेटल, 1838 रिझर्व्ह आणि टाइम्स ब्लॅक या कार्डांना हा नवीन नियम लागू होणार नाही. त्यांचं कार्ड बदलायचं शुल्क जुनंच राहील. मोफत विमा आता मिळणार नाही का?जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डसोबत मिळणाऱ्या मोफत विम्याचा लाभ घेत असाल, तर तो आता बंद केला जात आहे. बऱ्याच जणांना माहिती पण नसतं, क्रेडिट कार्डवर फ्री विमा मिळतो. विमान अपघात झाला तर विमा मिळायचा. तो आता बंद होतोय. बँक 15 डिसेंबर 2026 पासून काही कार्डांवर दिला जाणारा फ्री विमा बंद करणार आहे.

कोणती कार्डं?

एमराल्ड प्रायव्हेट मेटल, टाइम्स ब्लॅक, एमराल्ड, एमराल्ड प्रायव्हेट, डायमंट, सफिरो आणि रूबिक्स. या कार्डांवर आता विमान अपघाताचा विमा मिळणार नाही.याशिवाय ‘कोणत्याही कारणास्तव रद्द करण्याची सुविधा’ पण बंद होणार आहे. म्हणजे तुम्ही फ्लाईट किंवा हॉटेल बुक केलं आणि कोणत्याही कारणाने कॅन्सल केलं, तर पैसे परत मिळायचे. ही सुविधा एमराल्ड प्रायव्हेट मेटल, टाइम्स ब्लॅक, एमराल्ड आणि एमराल्ड प्रायव्हेट कार्डांवर होती. ती पण 15 डिसेंबरपासून बंद.त्याचप्रमाणे, पराक्रम आणि पराक्रम सिलेक्ट कार्ड वापरणाऱ्यांना मिळणारा वैयक्तिक आणि विमान अपघात विमा पण 15 डिसेंबरपासून बंद होणार आहे.

Inflation: ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई 6% टक्क्यांच्या पार, सामन्यांच्या तोंडाला फेस

मोफत मूव्ही तिकीट बंद

चित्रपटप्रेमी क्रेडिट कार्ड ग्राहकांनाही धक्का बसू शकतो.मूव्ही बघायला आवडणाऱ्यांना तर मोठाच झटका आहे. ICICI बँक 15 डिसेंबर 2026 पासून काही कार्डांवरची मोफत INOX मूव्ही तिकिटांची सोय बंद करणार आहे.

कोणती कार्डं?

Rubyx, Coral, Expressions, Chennai Super Kings, MakeMyTrip Platinum, MakeMyTrip Signature, MakeMyTrip, HPCL Super Saver आणि Emirates Rubyx. ही कार्डं वापरून आतापर्यंत लोकांना फ्री तिकीट मिळायचं. आता 15 डिसेंबरनंतर त्यांना स्वतःच्या पैशाने तिकीट घ्यावं लागेल.म्हणजे महिन्यातून एकदा फ्री मूव्ही बघायची सवय असेल तर ती आता बंद. आता तिकीटाचे पूर्ण पैसे मोजावे लागतील.

परदेशात खर्च केला तर जास्त शुल्क?

आयसीआयसीआय बँकेने काही बिझनेस आणि कॉर्पोरेट क्रेडिट कार्डांच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांशी संबंधित शुल्कातही बदल केला आहे.बिझनेस कार्ड वापरणाऱ्यांना पण फटका बसणार आहे. 25 नोव्हेंबर 2026 पासून, काही कार्डांवरचं डायनॅमिक करन्सी कन्व्हर्जन (DCC) शुल्क 1 टक्क्यावरून 3.50 टक्क्यांपर्यंत वाढवलं जाईल.

DCC म्हणजे काय?

तुम्ही परदेशात गेलात आणि तिथे रुपयांमध्ये पेमेंट केलं, तर त्यावर हे शुल्क लागतं. आधी 1 टक्का लागायचा, आता 3.50 टक्के लागेल. म्हणजे परदेशात 1 लाख खर्च केला तर आधी 1 हजार शुल्क लागायचं, आता 3500 रुपये लागतील.

हा बदल बिझनेस ब्लॅक ॲडव्हान्टेज, बिझनेस ब्लू ॲडव्हान्टेज, ट्रॅव्हल एजंट कार्ड, बिझनेस प्लॅटिनम कार्डांसाठी आहे.थोडक्यात, ICICI चं कार्ड असेल तर तुमचं कार्ड या लिस्टमध्ये आहे का, ते एकदा नक्की तपासा. 15 डिसेंबरच्या आधी असलेले फ्री फायदे वापरून घ्या. आणि कार्ड सांभाळून ठेवा, नाहीतर 11 डिसेंबरनंतर नवीन कार्डला 300 रुपये + GST द्यावा लागेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ICICI क्रेडिट कार्डचे नवीन नियम कधीपासून लागू होणार आहेत?

    Ans: नवीन नियम २५ नोव्हेंबर, ११ डिसेंबर आणि १५ डिसेंबर २०२६ अशा वेगवेगळ्या तारखांना लागू होणार आहेत.

  • Que: क्रेडिट कार्ड बदलण्यासाठी आता किती शुल्क द्यावे लागेल?

    Ans: ११ डिसेंबर २०२६ पासून कार्ड बदलण्यासाठी ३०० रुपये + GST शुल्क आकारले जाणार आहे.

  • Que: कोणत्या कार्डांवरील मोफत विमा बंद होणार आहे?

    Ans: Emerald, Sapphiro, Rubyx, Diamond, Times Black आणि इतर निवडक कार्डांवरील विमान अपघात विमा बंद होणार आहे.

Web Title: Icici credit card new rules 2026 free insurance movie tickets charges rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 05:11 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.