तुमचेही 'या' बँकेत खाते आहे का? 12 ऑगस्टपर्यंत करा 'हे' काम; ...अन्यथा खाते होईल बंद!
पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुमचेही पीएनबी बँकेमध्ये खाते असेल तर तुमचे बँक खाते लवकरच बंद होऊ शकते. पीएनबी बँकेच्या तब्बल तीन लाखहुन अधिक ग्राहकांच्या खात्यावर बंदची टांगती तलवार आहे. विशेष म्हणजे या ग्राहकांनी आपल्या बँक खात्याचे ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे या बँक खातेधारकांना १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र खातेधारकांचे खाते बंद केले जाणार आहे.
१२ ऑगस्टपर्यंत ई-केवायसीची मुदत
सरकारी क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ही सर्वात मोठी बँक आहे. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या खातेधारकांची संख्या 19 कोटीहुन अधिक आहे. त्यापैकी ३ लाखहुन अधिक खातेधारकांनी आपली ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन आता पीएनबी बँकेकडून खातेधारकांना १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र खातेधारकांचे खाते बंद केले जाणार आहे.
हेही वाचा : …बंद होणार महिलांसाठीच्या ‘या’ योजना; अर्थसंकल्पात झाली होती घोषणा; वाचा… नेमकं कारण!
थांबवले जाणार आर्थिक व्यवहार
खातेधारकांनी १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत आपली ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास, त्यांना बँकेचा कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाही. त्यामुळे आता तुमचेही पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) खाते असल्यास, तात्काळ आपली ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. अन्यथा तुम्हाला मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागू शकते. कारण, १२ ऑगस्टपर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास, तुमच्या खात्याचे सर्व व्यवहार थांबवले जाणार आहे.
हेही वाचा : एक बातमी… अन् शेअर बाजार पत्त्यासारखा कोसळला; गुंतवणूकदारांचे 4.41 लाख कोटींचे नुकसान!
काय आहे संपूर्ण प्रकरण?
देशातील सर्व बँकांची शिखर संस्था असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व बँका त्यांच्या खातेधारकांना नो युअर कस्टमर्स किंवा केवायसीमध्ये अपडेट करत आहेत. जर ग्राहकाने केवायसी अपडेट केले नाही तर बँक त्या खात्यातील ऑपरेशन थांबवू शकते. पंजाब नॅशनल बँकेमध्ये अजूनही सुमारे 3.25 लाख खातेधारक आहेत. ज्यांनी यावर्षी त्यांचे ई-केवायसी अपडेट केले नव्हते. बँकेने त्यांना त्यांचे केवायसी लवकरच अपडेट करण्यास सांगितले आहे.