अब्जावधी संपत्तीचा मालक, पण साधा मोबाईल फोनही नाही वापरत; वाचा... त्यांची अनोखी कहाणी!
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मोबाईल फोन ही सर्वांसाठीच खूप महत्वाची गोष्ट बनली आहे. आज असा एकही व्यक्ती सापडत नाही. ज्याच्याकडे मोबाईल फोन नसतो. माञ, आज आम्ही तुम्हाला एका अशा नामांकित अब्जाधीशाबाबत सांगणार आहोत. ज्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. माञ, ते अत्यंत साधे जीवन जगतात. अफाट संपत्ती असूनही, ते केवळ ६ लाख रुपयांची कार चालवतात. विशेष म्हणजे ते आपल्यासोबत मोबाईल फोन देखील वापरत नाही. याच पार्श्वभुमीवर आज आपण या अब्जाधीशाबाबत जाणून घेणार आहोत…
श्रीराम ग्रुपचे संस्थापक राममूर्ती त्यागराजन
राममूर्ती त्यागराजन असे त्यांचे नाव असून, ते श्रीराम ग्रुपचे संस्थापक आहेत. श्रीराम ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी लाखो कोटींची संपत्ती कमावली आहे. राममूर्ती त्यागराजन यांनी 1960 च्या दशकात एक छोटेखानी कंपनी सुरु केली. जी एक चिटफंड कंपनी होती. आज ती एक मोठी वित्तसंस्था (श्रीराम फायनान्स) बनली आहे. ही कंपनी कमी उत्पन्न असलेल्या लोकांना कर्ज उपलब्ध करुन देते. ज्या लोकांना बँका कर्ज देत अशा लोकांसाठी ही कंपनी मोठा आधार बनली आहे. आज या कंपनीचे मार्केट कॅप 8.5 अब्ज डॉलर्स इतके आहे. ही कंपनीने विम्यापासून स्टॉक ब्रोकिंगपर्यंतच्या क्षेत्रात 108,000 लोकांना रोजगार दिला आहे.
हेही वाचा – ‘हे’ आहेत भारतीय तंञज्ञान क्षेञातील टॉप-10 अब्जाधीश; …संपत्ती वाचून अवाक् व्हाल!
वापरतात केवळ ६ लाखांची गाडी
कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यागराजन अत्यंत साधे जीवन जगतात. अनेक वर्षांपासून ते आपल्याकडील ह्युंदाई हॅचबॅक कार चालवतात. जी त्यांनी 6 लाख रुपयांना खरेदी केली होती. विशेष म्हणजे त्यांच्याकडे मोबाईल फोन देखील नाही. त्यांची भावना आहे की, मोबाईल फोन हा कामापासून विचलित करतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी 750 दशलक्ष किमतीच्या कंपनीतील आपली हिस्सेदारी विकून, ते पैसे दान केले होते.
त्यागराजन आता 86 वर्षांचे असून, ते इतके दानशुर आहेत की, त्यांनी श्रीराम कंपन्यांमधील त्यांचे संपूर्ण स्टॉक कर्मचाऱ्यांच्या गटाला दिले आहेत. जे 2006 मध्ये स्थापन झालेल्या श्रीराम ओनरशिप ट्रस्टकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या कायमस्वरूपी ट्रस्टचे 44 गट अधिकारी लाभार्थी आहेत.
सामान्यांसाठी काम करण्याची उर्मी
राममूर्ती त्यागराजन यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, क्रेडिट हिस्ट्री किंवा नियमित उत्पन्न नसलेल्या लोकांना कर्ज देणे हे इतकेही धोकादायक नाही, जितके ते मानले जाते. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी या व्यवसायात प्रवेश केला. ते सांगतात, “ज्या लोकांचे जीवन आधीच चांगले आहे त्यांच्यासाठी जीवन अधिक चांगले बनवण्याबद्दल आपण कधीही उत्सुक नव्हतो.” त्याऐवजी, मला “समस्यांमध्ये अडकलेल्या लोकांच्या जीवनातून काही त्रास दूर करायचा होता.”