'हे' आहेत भारतीय तंञज्ञान क्षेञातील टॉप-10 अब्जाधीश; ...संपत्ती वाचून अवाक् व्हाल!
सध्याच्या घडीला तंञज्ञानाच्या बदलामुळे अनेक क्षेञात मोठे बदल झालेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तंञज्ञानामुळे मानवी जीवन सुखकर झाले आहे. माञ, याच तंञज्ञानाच्या जोरावर अनेक कोट्याधीश झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभुमीवर आज आपण भारतातील काही दिग्गज मंडळींबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी तंञज्ञानाच्या जोरावर देशात कोट्यावधींची कमाई केली आहे.
शिव नारद पहिल्या स्थानावर
भारतातील टॉप १० अब्जाधीशांच्या यादीबाबत बोलायचे झाले तर या यादीमध्ये सर्वात पहिले नाव हे एचसीएल टेक्नॉलॉजीचे संस्थापक शिव नारद यांच्या नाव आघाडीवर आहे. त्यांनी टेक जगतात आपले नशीब आजमावत आपले स्थान निर्माण केले आहे. फोर्ब्सच्या तंञज्ञान क्षेञातील अब्जाधीशांच्या यादीनुसार, त्यांची एकूण संपत्ती ही 34.7 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
हेही वाचा – 1 लाखाचे पाच दिवसांत झाले, पावणे दोन लाख; ‘या’ शेअरमुळे गुंतवणुकदार मालामाल!
अजीम प्रेमजी दुसऱ्या स्थानावर
फोर्ब्सच्या तंञज्ञान क्षेञातील अब्जाधीशांच्या यादीमध्ये दुसरे स्थान हे आयटी कंपनी विप्रो कंपनीचे माजी अध्यक्ष अजीम प्रेमजी यांना देण्यात आले आहे. अजीम प्रेमजी यांची एकूण संपत्ती 11.8 अब्ज डॉलर्स इतकी आहे. याशिवाय ग्लोबल आयटी कंपनी इन्फोसिसचे सरसंस्थापक एन.आर.नारायण मूर्ती टेक अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 4.4 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
‘ही’ आहेत यादीतील अन्य नावे?
तर या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर जोहो कॉर्पोरेशनच्या सहसंस्थापक राधा वेम्बू असून, त्यांची एकूण संपत्ती 3.3 अब्ज डॉलर्स इतकी आहे. तर सेनापती गोपालकृष्णन हे या यादीमध्ये पाचव्या स्थानावर असून, ते इन्फोसिस या आयटी कंपनीचे सहसंस्थापक आहेत. त्यांच्याकडे एकूण 3.2 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे.
याशिवाय इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी 2.9 अब्ज डॉलर्ससह सहाव्या स्थानावर, इन्फो एज कंपनीचे सहसंस्थापक संजीव बिखचंदानी 2.9 अब्ज डॉलर्स संपत्तीसह सातव्या स्थानावर आहे. झोहो कोर्पोरेशनचे सहसंस्थापक श्रीधर वेम्बू हे 2.5 अब्ज डॉलर्स संपत्तीसह आठव्या स्थानावर आणि पर्सिस्टंट सिस्टम्सचे आनंद देशपांडे हे या यादीमध्ये 2.2 अब्ज डॉलर्सची संपत्तीसह दहाव्या स्थानावर आहे.