Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, अग्रीम पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Crop Insurance Advance: पूर्णा तालुका परिसरातील शेतशिवारात खरीप हंगाम २०२४ च्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यासाठी सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली होती. मागील तीन ते चार महिन्यांपासू

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Apr 11, 2025 | 04:06 PM
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, अग्रीम पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, अग्रीम पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

Crop Insurance Advance Marathi News: खरीप हंगाम २०२४ ची पंचवीस टक्के अग्रीम पीक विमा नुकसान भरपाई रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पूर्णा तालुका परिसरातील शेतशिवारात खरीप हंगाम २०२४ च्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यासाठी सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली होती. मागील तीन ते चार महिन्यांपासून पीकविमा अग्रीम मिळण्याची शेतकरी वाट बघत होते. अखेर आजपासून प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा अग्रीमची रक्कम जमा होणार आहे. शेतकऱ्यांना ३३५.९० कोटी रुपयांची अग्रीम मंजूर झालेली आहे.

अखेर शासनाने हप्ता मंजूर केल्याने ती अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी जिल्ह्यात ७ लाख ६३ हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, खरीप ज्वारी, बाजरी या पिकांसाठी ५ लाख २४ हजार २६७ हेक्टरचा विमा उतरवला होता, सोयाबीन, कापूस व तूर या पिकांसाठी विमा मंजूर झाला होता.

Share Market: अमेरिका आणि आशियाई बाजारात भूकंप; सेन्सेक्स निफ्टीवर होईल परिणाम, कसा असेल भारतीय शेअर बाजार

यात ७ लाख १४ हजार १६१ शेतकऱ्यांनी या पिकांसाठी नोंद केली आहे. यामध्ये सोयाबीन ३ लाख ८५ हजार हेक्टर, कापूस, ८९ हजार हेक्टर तर तूर ३५ हजार ५४७ हेक्टर असा पीकविमा भरलेले क्षेत्र आहे.

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर अग्रीम जाहीर करण्यासाठी रेटा लावण्यात आला होता. यामुळे तो मंजूरही झाला. मात्र मागील तीन ते चार महिन्यांपासून तो अदा केला जात नसल्याने शेतकरी त्रस्त झाले होते.

अनेक पक्ष, संघटनांनी यासाठी निवेदनेही दिली होती. आंदोलनेही करण्यात आली होती. त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाकडून हे पैसे जमा होण्याची प्रतीक्षा संपली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

आजपासून होणार वितरण

पीकविम्याबाबत कायम औदासीन्य बाळगणाऱ्या कृषी विभागाला अजूनही याबाबत काहीच माहिती नसल्याचे दिसते. प्रभारी कृषी अधीक्षक अधिकारी दौलत चव्हाण यांनी यावर बोलण्यास नकार दिला. मात्र विमा कंपनीच्या जिल्हा समन्वयकांनी कंपनीचे प्रिमियम मिळाल्याने आजपासून शेतकऱ्यांना वितरण होणार असल्याचे सांगितले.

आजपासून विम्याची रक्कम खात्यात जमा होणार

ज्या शेतकऱ्यांना अग्रीम मंजूर झाली, त्यांच्या खात्यावर 10 एप्रिलपासून रक्कम जमा होणार आहे. सोयाबीन उत्पादकांना २६८.५९ कोटी रुपये, कापूस ५३ कोटी तर तुरीसाठी १४.१४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

Web Title: Important news for farmers advance crop insurance amount deposited in farmers accounts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • Business News
  • Crop Insurance

संबंधित बातम्या

१० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या अडचणीत! Zepto आणि Blinkit च्या व्यवसायावर संकट; नेमकं कारण काय?
1

१० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या अडचणीत! Zepto आणि Blinkit च्या व्यवसायावर संकट; नेमकं कारण काय?

Anil Agarwal Son Death: वेदांता ग्रुपचे अध्यक्ष Anil Agarwal यांना पुत्रशोक! भावनिक प्रतिक्रिया देत म्हणाले, “मी 75% संपत्ती….
2

Anil Agarwal Son Death: वेदांता ग्रुपचे अध्यक्ष Anil Agarwal यांना पुत्रशोक! भावनिक प्रतिक्रिया देत म्हणाले, “मी 75% संपत्ती….

प्लास्टिक कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती! Avro India उभारणार देशातील सर्वात मोठा रिसायकलिंग प्लांट
3

प्लास्टिक कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती! Avro India उभारणार देशातील सर्वात मोठा रिसायकलिंग प्लांट

Union Budget 2026: ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोठा दिलासा? करसवलत आणि व्याजदर बदलाची शक्यता
4

Union Budget 2026: ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोठा दिलासा? करसवलत आणि व्याजदर बदलाची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.