आता... इंटरनेट विना करा युपीआय पेमेंट; व्यवहाराच्या मर्यादेतही वाढ, ग्राहकांना मोठा दिलासा!
भारतात युपीआय पेमेंट खूप लोकप्रिय आहे. दररोज हजारो कोटी रुपयांचे व्यवहार त्या माध्यमातून होत आहेत. युपीआयने रोख पैसे सोबत ठेवण्याची गरज नाहीशी केली आहे. तसेच व्यवहार खूप सोपे आणि सुरक्षित केले आहेत. मात्र, युपीआय या महिन्यात दोन दिवस बंद राहणार असून, लोकांना युपीआय वापरता येणार नाही. एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे. नेमके हे दोन दिवस कोणते आहेत, त्याबाबत जाणून घेऊयात…
एचडीएफसी बँकेची युपीआय सेवा 2 दिवस बंद राहणार
एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना नोव्हेंबरमध्ये दोन दिवस बँकेची युपीआय सेवा वापरता येणार नसल्याचे सांगितले आहे. बँकेच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेची यूपीआय सेवा काही महत्त्वाच्या सिस्टीम मेंटेनन्समुळे नोव्हेंबरमध्ये दोन दिवस बंद राहणार आहे. एचडीएफसी बँकेची युपीआय सेवा वापरणारे ग्राहक 5 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर रोजी युपीआयद्वारे पैसे पाठवू किंवा स्वीकारू शकणार नाहीत.
हे देखील वाचा – “मला काही फरक पडत नाही…; खरंच भाविश अग्रवाल असे बोलले? कॉमेडियन कामराची नवीन पोस्ट!
युपीआय सेवा कोणत्या कालावधीत बंद राहणार?
एचडीएफसी बँकेने सांगितले की, बँकेची युपीआय सेवा 5 नोव्हेंबर रोजी रात्री 12.00 ते 02.00 पर्यंत 2 तास आणि त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी सकाळी (पहाटे) 12.00 ते 03.00 पर्यंत 3 तासांसाठी बंद राहणार आहे. बँकेने म्हटले आहे की, या कालावधीत, एचडीएफसी बँकेच्या चालू आणि बचत खात्यांवर तसेच रुपे कार्डवर कोणतेही आर्थिक युपीआय व्यवहार करता येणार नाहीत. याशिवाय जे दुकानदार एचडीएफसी बँकेच्या यूपीआय सेवेद्वारे पेमेंट स्वीकारतात. त्यांनाही या कालावधीत पेमेंट स्वीकारता येणार नाही.
हे देखील वाचा – ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना बनवले करोडपती; वर्षभरात मिळाला तब्बल 38000 टक्के परतावा!
एचडीएफसी बँक खात्याशी लिंक केलेले युपीआय खाते काम करणार नाही
एचडीएफसी बँकेच्या खात्याला तुमचे युपीआय जोडलेले असल्यास, तुम्ही एचडीएफसी बँक मोबाइल ॲप, पेटीएम, फोनपे, गुगल पे, मोबिक्विकसारख्या UPI द्वारे पैसे पाठवू किंवा प्राप्त करू शकणार नाही. त्यामुळे या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना केले आहे. फोनपे, गुगल पे वापरता येणार नाही. एचडीएफसी बँकेत खाते असणाऱ्या ग्राहकांना 5 आणि 23 नोव्हेंबरला काही काळासाठी युपीआय पेमेंट करता येणार नाही. त्यामुळे या कालावधीत व्यवहार टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.