गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन कुणाल कामरा आणि ओला इलेक्ट्रिकचे सर्वेसर्व्हा भाविश अग्रवाल यांच्यातील समाजमाध्यमावरील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. कॉमेडियन कुणाल कामरा हे भाविश अग्रवाल यांच्या हात धुवून मागे लागले असून, कामरा यांनी आणखी एका ऑनलाइन पोस्टद्वारे भाविश यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. यावेळी कामरा यांनी ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड घसरणीबाबत भाविश अग्रवाल यांच्यावर निशाणा साधला असून, ओलाचे शेअर्स 52 आठवड्यांतील नीचांकी पातळीवर गेल्याबद्दल त्यांच्यावर हा हल्ला त्यांनी चढवला आहे.
आरोप-प्रत्यारोप सुरुच
कॉमेडियन कुणाल कामरा यांनी ओलाच्या इलेक्ट्रिकच्या विक्रीनंतरच्या सेवेवर चिंता व्यक्त केल्यावर हे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. यानंतर लगेचच ओलाच्या सीईओने कुणालला एक दिवस त्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये येण्यास सांगितले. यानंतर कुणाल कामरा आणि भाविश अग्रवाल यांच्यातील ऑनलाइन भांडण जवळपास प्रत्येक दिवशी पाहायला मिळत आहे आणि लोक त्यावर कमेंट करत आहे. तर काहीजण हा वाद समाजमाध्यमांवर शेअर देखील करत आहे.
“मला काही फरक पडत नाही…
कुणाल कामरा आणि भाविश अग्रवाल यांच्यातील समाजमाध्यमावर सुरु असलेले हे शाब्दिक युद्ध बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. परिणामस्वरुप ओलाचा स्टॉक सर्वकालीन निच्चांकी पातळीवर गेला आहे, कुणाल कामराने याच मुद्द्यावर भाविश अग्रवालचा डीपफेक व्हिडिओ शेअर केला आहे. या डीपफेक व्हिडिओमध्ये भाविश अग्रवाल बाल संत अभिनव अरोरा यांच्या गेटअपमध्ये दिसत आहेत आणि त्यांच्या शैलीत म्हणत आहेत, “मला काही फरक पडत नाही…
खरे तर, अलीकडच्या काळात बाल संत अभिनव अरोरा यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. कुणाल कामरा यानेही या विषयाचा वापर आपल्या एक्स-पोस्टचा आवाका वाढवण्यासाठी केल्याचे दिसून आले होते.
ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये घसरण
ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स मंगळवारी सुमारे 4 टक्क्यांनी घसरले होते. त्याची इश्यू किंमत 76 रुपये म्हणजेच 74.82 रुपये प्रति शेअरच्या खाली गेली होती. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा शेअर मुंबई शेअर बाजारात (बीएसई) ७५.९९ रुपये आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) ७६ रुपयांवर लिस्ट झाला आहे. ओलाच्या समभागांची सूची कदाचित शांत झाली असेल, पण त्यानंतरच्या दिवसांत त्यावर 20-20 टक्क्यांचा वरचा सर्किटही दिसला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)