अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केट सपाट; गुंतवणूकदारांची निराशा
दिवाळीच्या मुहूर्ताच्या ट्रेडिंगमध्ये शेअर बाजारातील कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी उसळी दिसून आली आहे. अशातच आता शेअर बाजारात उजास एनर्जी लिमिटेड हा मल्टीबॅगर स्टॉक म्हणून समोर आला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना अत्यंत कमी वेळात चांगला परतावा मिळवून दिला आहे. या स्टॉकने एक वर्षभरात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. त्यामुळे अल्पावधीतच अनेक गुंतवणूकदार करोडपती झाल्याचे पाहायला मिळत आहे.
उजास एनर्जी लिमिटेड ही कंपनी अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करते. कंपनीचे मुख्य कार्यालय इंदूर या ठिकाणी आहे. विशेष म्हणजे मागील सहा महिन्यात देखील अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या या उजास एनर्जी या कंपनीने गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा मिळवून दिला आहे. या शेअरने गुंतवणूकदाराचे पैसे दोन महिन्यांत दुप्पट आणि तीन महिन्यांत तिप्पट केले आहेत. तर या शेअरच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना 6 महिन्यांत जवळपास 20 पट परतावा मिळाला आहे. उजास एनर्जी ही एक छोटी वीज निर्मिती कंपनी आहे.
दोन महिन्यांत रक्कम दुप्पट
उजास एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या शेअरने दोन महिन्यांत गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम दुप्पट करून दिली आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअरची किंमत 325 रुपये होती. आता तो 648.50 रुपयांपर्यंत वाढला आहे. अशा परिस्थितीत या शेअरने दोन महिन्यांत जवळपास 100 टक्के नफा दिला आहे.
हे देखील वाचा – एलॉन मस्क US निवडणूक प्रचारात व्यस्त; X वर मात्र कर्मचारी कपातीची टांगती तलवार
तीन महिन्यांत तिप्पट नफा
दरम्यान, उजास एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या शेअरने मागील तीन महिन्यांत गुंतवणूकदारांना तिप्पट परतावा मिळवून दिला आहे. तीन महिन्यांपूर्वी, म्हणजे जुलैच्या सुरुवातीला, कंपनीच्या शेअरची किंमत 210 रुपये इतकी होती. जी आता 648.50 रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही तीन महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते. तर आज तुम्हांला या शेअरच्या माध्यमातून 3 लाख रुपये इतका परतावा मिळाला असता.
उजास एनर्जीच्या या शेअरने गुंतवणूकदारांना एक वर्षात करोडपती बनवले आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीला या शेअरची किंमत 2 रुपयांपेक्षा कमी होती. म्हणजे सुमारे 1.70 रुपये इतके शेअरचे मुल्य होते. तर आतापर्यंत एक वर्षभरात या शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे 38000 टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते. तर आज या शेअरची किंमत 3.80 कोटी रुपये इतकी झाली असती. अर्थात केवळ एक लाख रुपये गुंतवून तुम्ही एक वर्षभरात करोडपती झाला असता.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)