Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Income Tax Notices: आयटीआरमध्ये छोटी चूक? लगेच येईल नोटीस! परंतु, यामध्ये ही ‘किती’ प्रकारच्या असतात नोटिस? 

तुमचा आयटीआर दाखल करताना उत्पन्न लपवले असेल, करबचत गुंतवणुकीचा पुरावा दिला नसेल, क्रेडिट कार्डवर जास्त खर्च केला असेल किंवा विभागाच्या नोंदींशी जुळत नसलेले आर्थिक व्यवहार केले असतील, तर तुम्हाला निश्चितच आयकर सूचना मिळेल

  • By Priti Hingane
Updated On: Dec 01, 2025 | 05:06 PM
आयटीआरमध्ये छोटी चूक? लगेच येईल नोटीस! परंतु, यामध्ये ही 'किती' प्रकारच्या असतात नोटिस?(Concept Photo)

आयटीआरमध्ये छोटी चूक? लगेच येईल नोटीस! परंतु, यामध्ये ही 'किती' प्रकारच्या असतात नोटिस?(Concept Photo)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रत्येक आयकर नोटीसचा अर्थ वेगळा
  • क्रेडिट कार्डवर जास्त खर्च टाळा
  • नोटीस थेट तुमच्या मेलवर येईल
 

Income Tax Notices: जर तुम्ही ITR दाखल करताना तुमचे उत्पन्न लपवले किंवा गुंतवणुकीचा पुरावा दिला नसेल, क्रेडिट कार्डवर जास्त प्रमाणात खर्च केला असेल किंवा असलेल्या नोंदणीला जुळत नसलेले आर्थिक व्यवहार सादर केले असतील, तर तुम्हाला निश्चितच आयकरकडून नोटिस बजावण्यात येईल. अनेक लोकांना आयकर सूचनेचा उद्देश माहित नसल्याने गोंधळ उडतो. जर ग्राहकाचे वार्षिक उत्पन्न करपात्र असल्यास त्याला आयटीआर दाखल करणे अनिवार्य आहे; अन्यथा, आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात येते.

परंतु, ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आयकर विभागाची नोटिस ही रिटर्नमधील कमतरता ओळखण्यासाठी किंवा स्पष्टीकरण मागण्यासाठी असते. करदात्याने करबचत गुंतवणुकीचा पुरावा दिला नसेल अथवा मोठे बँक व्यवहार केले असतील किंवा क्रेडिट कार्डवर अधिक खर्च केला असेल तर त्यांना निश्चित नोटिस येते. कधीतरी जर विभागाच्या नोंदींशी जुळत नसलेले इतर आर्थिक व्यवहार त्यांना आढळले तरी तुम्हाला नोटिस येऊ शकते.

हेही वाचा : PAN-Aadhaar Update: PAN-Aadhaar लिंकची शेवटची संधी! उशीर झाला तर आर्थिक व्यवहार होतील ठप्प

कलम 139(9) आणि कलम 133 (6) त्यांच्यातला फरक 

कलम 139(9) नोटीस तेव्हा पाठवली जाते तेव्हा तुमच्या आयटीआरमध्ये काही त्रुटी किंवा कमतरता असतील. ती सदोष रिटर्न मानली जाईल आणि तेव्हा कलम 139(9) ची नोटीस आयकर विभागाकडून पाठवण्यात येईल.

मात्र, कलम 133(6) ची नोटीस तुमचे उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त असेल किंवा तुम्ही ITR दाखल केला नसेल तर पाठवली जाते. त्याचप्रमाणे, उत्पन्न तुमच्या आयटीआरमध्ये तुमची माहिती योग्यरित्या नोंदवले गेले नसेल अथवा खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा अधिक असतील तर आयकर विभाग ही नोटीस पाठवू शकतो.

कलम 142(1) आणि कलम 143(1) यांच्यातील फरक 

आयकर कलम 142(1) ची नोटीस आयकर रिटर्नमध्ये करदात्याने केलेल्या दाव्याचे त्यांनी  समर्थन करावे यासाठी विभागाला रिटर्नशी संबंधित जास्तीची माहिती आवश्यकता असल्यावर नोटीस पाठवली जाते. तसेच, जर ग्राहकाने आयटीआर दाखल नसेल केला तरी देखील नोटिस पाठवली जाते.

कलम 143(1) ची नोटीस विभागाचे उत्पन्न असलेली मोजणी रिटर्नशी जुळते आहे की नाही पाहायला नोटीस पाठवली जाते. याला मूल्यांकन देखील म्हणतात.

हेही वाचा : Mumbai Real Estate: मुंबई रिअल इस्टेटचा धमाका! नोव्हेंबरमध्ये १२२१९ नोंदणी, २०% वर्षभरातील सर्वाधिक वाढ

कलम 143(2) आणि कलम 148 

आयकर विभाग कलम 143(2) आणि कलम 143 (1) नंतर, कलम 143(2) नोटीस पाठवून देतो. एखादा करदाता कलम 143(1) चे उत्तर देत नसेल तर त्याला ही नोटिस पाठवली जाते. उत्पन्नाचा काही भाग लपवला असल्याचे लक्षात आल्यावर कलम 148 नोटीस पाठवली जाते. कर, व्याज किंवा दंडाची रक्कम बाकी असेल तर तेव्हा आयकर विभाग 156 नोटीस पाठवते.

Web Title: Income tax notices small mistake in itr notice will come immediately but how many types of notices are there

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 05:06 PM

Topics:  

  • income tax
  • ITR File

संबंधित बातम्या

Income tax trend: रिटर्न कमी, महसूल जास्त! टीडीएसने कर संकलनाला दिला ‘सुपर बूस्ट’.; ‘डिजिटल भारत’ची मोठी छाप 
1

Income tax trend: रिटर्न कमी, महसूल जास्त! टीडीएसने कर संकलनाला दिला ‘सुपर बूस्ट’.; ‘डिजिटल भारत’ची मोठी छाप 

ITR Refund Delayed: आयटीआर परतावा अडकला? आर्थिक नुकसान टाळण्यासाठी परतफेडी विलंबा मागची खरी कारणे जाणून घ्या
2

ITR Refund Delayed: आयटीआर परतावा अडकला? आर्थिक नुकसान टाळण्यासाठी परतफेडी विलंबा मागची खरी कारणे जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.