शेअर बाजार का कोसळला (फोटो सौजन्य - iStock)
2025 च्या पहिल्या सोमवारी शेअर बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही हिरव्या चिन्हांसह ट्रेंड करत होते. चीनी व्हायरस एचएमपीव्हीचे तीन प्रकरण भारतात आढळताच बाजारात घबराट पसरली. मोठी उलथापालथ झाली. वाढीसह खुल्या बाजारात 1400 अंकांची घसरण झाली आणि काही तासांतच गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे आता समोर आले आहे.
सोमवार, 6 जानेवारी रोजी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1400 अंकांनी घसरला. निफ्टी निर्देशांक 365 अंकांनी घसरला. निर्देशांकातील सर्व समभागांनी लाल चिन्ह गाठले. मोठ्या समभागांची स्थिती बिकट दिसत होती. टाटा स्टील, एचडीएफसी बँक, अदानी पोर्ट्स, रिलायन्स यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्स 1400 अंकांनी घसरून आजच्या 77,782 अंकांच्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आला, तर निफ्टी 23,600 च्या खाली घसरला.
शेअर बाजार क्रॅश होण्याचे कारण
सोमवारी सकाळी सेन्सेक्स वाढीसह उघडला होता, परंतु भारतात एचएमपीव्ही व्हायरसने गुंतवणुकदारांच्या मनात भीती निर्माण केली. बंगळुरू आणि गुजरातमध्ये चिनी विषाणूची प्रकरणे समोर आल्यानंतर गुंतवणूकदार घाबरले होते.
भारतात विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. व्हायरस पसरण्याच्या बातम्यांमध्ये गुंतवणूकदार सुरक्षितपणे खेळत आहेत. बंगळुरूमध्ये 8 महिन्यांच्या आणि 3 महिन्यांच्या मुलामध्ये HMPV विषाणू आढळून आला आहे. गुजरातमधील एका 2 महिन्यांच्या मुलीमध्येही हा विषाणू आढळून आला आहे.
व्हायरसमुळे बाजाराची घसरण
व्हायरसमुळे बाजारातील घसरणीमागे इतरही अनेक कारणे आहेत. विदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे शेअर बाजारावर दबाव आहे. तिसऱ्या तिमाहीतील निकालांमुळे बाजारही हादरला आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भू-राजकीय तणावामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती. यामुळे बाजारात घसरण झाली असल्याचे दिसून आले आहे. अनेक गुंतवणुकदारांना यामुळे धक्का बसला आहे. सध्या वेगवेगळ्या ठिकाणी जगात अचानक उद्भवलेल्या गोष्टींचा थेट परिणाम शेअर बाजारावर होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांसाठी नक्कीच ही आनंदाची बाब नाही.
Share Market : शेअर बाजारात भूकंप; गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले, मोठं कारण आलं समोर
बाजारात अस्थिरता
चीनी व्हायरस आल्यामुळे आता बाजारात घबराटीसह अस्थिरताही निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच बाजार क्रॅश झाल्याचे समोर आले आहे. मात्र आता कोरोनासारखी स्थिती निर्माण होण्याची चिन्ह तर नाही ना असाच प्रश्न सर्वांच्या मनात आहे. बाजारातील अस्थिरता आता कधी आणि कशी कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. इतकंच नाही तर पुन्हा एकदा अशी परिस्थिती उद्भवू नये अशीच प्रार्थना सर्व जण करत असल्याचे दिसून येत आहे. पण आता बाजार नक्की कधी सुधारणार आणि शेअर मार्केटचा भाव कधी वधारणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.