Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: गुंतवणूकदारांनो सावध राहा! लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार? तज्ज्ञांनी दिला इशारा

Share Market Update: गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-डाउन सुरुवातीचे संकेत देत आहेत. सुमीत बागडिया यांनी आजच्या व्यवहारात पाच शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 23, 2026 | 09:05 AM
Stock Market Today: गुंतवणूकदारांनो सावध राहा! लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार? तज्ज्ञांनी दिला इशारा

Stock Market Today: गुंतवणूकदारांनो सावध राहा! लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार? तज्ज्ञांनी दिला इशारा

Follow Us
Follow Us:
  • भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-डाउन सुरुवातीचे संकेत
  • शेअर बाजार लाल रंगात उघडण्याची शक्यता
  • शुक्रवारी, शॉर्ट-कव्हरिंगच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार वधारला
India Share Market Update: चौथ्या आठवड्यात देखील अमेरिका आणि ईराण यांच्यामधील युद्ध सुरुच आहे. जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांचा विचार केला तर आज सोमवारी भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, मोठ्या घसरणीसह उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-डाउन सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास ३१५ पॉइंट्सच्या सवलतीवर, २२,८२५ च्या पातळीवर व्यवहार करत होता. आजचा शेअर बाजार लाल रंगात उघडणार असल्याने गुंतवणूकदारांनी आज व्यवहार करताना सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर नरमले, चांदीही घसरली! तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

शुक्रवारी, शॉर्ट-कव्हरिंगच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार वधारित बंद झाला, आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,१०० च्या पातळीच्या वर बंद झाला. सेन्सेक्स ३२५.७२ अंकांनी, म्हणजेच ०.४४ टक्क्यांनी वाढून ७४,५३२.९६ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ११२.३५ अंकांनी, म्हणजेच ०.४९ टक्क्यांनी वाढून २३,११४.५० वर स्थिरावला. बँक निफ्टी निर्देशांक शुक्रवारी २३.९५ अंकांनी, म्हणजेच ०.०४% ने घसरून ५३,४२७.०५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना पाच शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सुमीत बागडिया यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये लॉरस लॅब्स, बँक ऑफ इंडिया, एपीएल अपोलो ट्यूब्स, दिल्लीवेरी आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक, जिगर एस. पटेल यांनी पुढील एक ते दोन आठवड्यांसाठी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्स्सची शिफारस केली आहे. जिगर एस. पटेल यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये हिंदुस्तान कॉपर, गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे.

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी आज २३ मार्च रोजी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार जीपीआयएल, एनटीपीसी, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, इटरनल, आयसीआयसीआय बँक, आयशर मोटर्स, दिल्लीवेरी आणि एनटीपीसी ग्रीन हे शेअर्स खरेदी करू शकतात.

Rupee Falls Against Dollar: रुपया घसरणीमुळे अर्थव्यवस्थेवर दबाव; ९५ चा टप्पा ओलांडणार का?

निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड (FACT), चंबळ फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड, सीसीएल प्रॉडक्ट्स (इंडिया) लिमिटेड आणि ऑरोबिंदो फार्मा लिमिटेड हे चार शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Indian stock market benchmark indices sensex and nifty 50 are open lower on monday share market news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट
1

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO
2

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit
3

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
4

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.