Rupee Falls Against Dollar: रुपया घसरणीमुळे अर्थव्यवस्थेवर दबाव; ९५ चा टप्पा ओलांडणार का? (फोटो-सोशल मीडिया)
रशियन, कोरियन आणि थाई चलने देखील घसरली आहे. दुसरीकडे चीन, ब्रिटन, ब्राझील यासारख्या देशांच्या चलनांत मात्र तेजी दिसून आली आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) अनेक पावले उचलली आहेत. मार्च २०२६ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत रुपया २६६ पैशांनी घसरून ९१.०५ वरून ९३.७१ प्रति डॉलरवर पोहोचला आहे. ही घसरण केवळ अल्पकालीन नसून दीर्घकाळासाठी चिंतेचा संकेत देते. आकडेवारीनुसार, १ एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत रुपया ८२६ पैशांनी कमकुवत झाला आहे, त्यावेळी रुपयाचा दर प्रति डॉलर ८५.४५ इतका होता.
आरबीआयचा परिणाम मर्यादित बाजार तज्ज्ञांच्या मते, भारतीय रिझर्व्ह बँकेने रुपया सावरण्यासाठी हस्तक्षेप केला आहे. परंतु, जागतिक तणावापुढे त्याचा प्रभाव मर्यादित राहिला आहे. रुपयाची घसरण पाहता रुपया ९५ ची पातळी ओलांडू शकतो. रुपयाची घसरण पाहता, तो ९५ रुपयांच्या पार जाईल का? हा मोठा प्रश्न आहे. गोल्डमन सॅक्सचे मुख्य् भारत अर्थशास्त्रज्ञ शांतनु सेनगुप्ता यांच्या मते, व्यवहार तोल तूट आणि ‘नेट शॉट फॉरवर्ड बुक’ मधील दबावामुळे रुपयावर ताण कायम राहील. अनेक विश्लेषकांच्या मते, येत्या सहा महिन्यांत रुपया ९५ ची पातळी ओलांडू शकतो. आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-३६ हे गेल्या दशकातील रुपयासाठी सर्वांत वाईट वर्ष ठरले आहे. इतिहासात यापेक्षा मोठी घसरण केवळ २००८-०९ च्या जागतिक आर्थिक संकटाच्या वेळी (१०५८ पैसे) पाहायला मिळाली होती.
India’s Coal Production: एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचे ओलांडले लक्ष्य; वीज प्रकल्पांसाठी ‘बफर’ स्टॉक
तेलाच्या भीतीमुळे वाढला दबाव इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. ब्रेट कूडचे दर प्रति बॅरल ११२ डॉलरच्या पार गेले. अलीकडेच त्यानी ११६ डॉलरचा टप्पा गाठला होता. तेलाच्या किमती दीर्घकाळ १०० डॉलरच्या वर राहण्याच्या भीतीमुळे रुपयावर प्रचंड दबाव निर्माण झाला. १ मार्चपासून आतापर्यंत विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भारतीय शेअर बाजारातून सुमारे ८० हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत, मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने बाजारात डॉलरची मागणी अधिक आहे, त्यामुळे रुपया अधिकच कमकुवत झाला आहे.






