Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंद्रिया, आदित्य बिर्ला ज्वेलरीसह साकार करा तुमच्या स्‍वप्‍नातील वधुरूप!

इंद्रिया, आदित्य बिर्ला ज्वेलरीने प्रत्येक वधूच्या स्वप्नातील वधुरूप साकार करण्याच्या उद्देशाने नवे ब्रायडल कॅम्पेन सादर केले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 14, 2026 | 08:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

इंद्रिया, आदित्य बिर्ला ज्वेलरीने आपल्या नव्या ब्रायडल कॅम्पेनची घोषणा करत प्रत्येक वधूच्या स्वप्नातील वधुरूप साकार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. लग्नाचा दिवस येण्याच्या खूप आधीपासून प्रत्येक वधू आपल्या आयुष्यातील या खास क्षणांची कल्पना करत असते. तिची स्वप्ने, सांस्कृतिक मूल्ये आणि वैयक्तिक आकांक्षा यांतून तिचे वधुरूप आकार घेत असते. हाच भाव केंद्रस्थानी ठेवत इंद्रियाने हे नवे अभियान सादर केले आहे.

India Electronics Exports: भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना मिळाली जागतिक पसंती; तब्बल निर्यात ‘इतक्या’ कोटींच्या दिशेने

इंद्रियाचे ब्रायडल ज्वेलरी कलेक्शन प्रत्येक वधूला स्वतःचे व्यक्तिमत्त्व खुलवण्याची संधी देते. भारतीय परंपरेत रुजलेली पण आधुनिक संवेदनांना साजेशी अशी ही दागिन्यांची रचना आहे. या कलेक्शनमध्ये हाताने घडवलेले उत्कृष्ट दागिने असून हार, मांगटीका, बांगड्या, माथापट्टी, कानातले अशा अनेक अलंकारांचा समावेश आहे. सोने, पोलकी आणि हिऱ्यांपासून तयार करण्यात आलेले तब्बल २८ हजारांहून अधिक दागिने या कलेक्शनमध्ये असून, प्रत्येक दागिन्यात प्रेम, बारकाई आणि कारागिरीची झलक दिसून येते.

या संपूर्ण कलेक्शनचे खास आकर्षण म्हणजे ‘सप्तपद्म’ हा वधूचा खास हार. लग्नातील सात वचने आणि शुद्धतेचे प्रतीक असलेल्या कमळापासून प्रेरणा घेऊन हा हार डिझाइन करण्यात आला आहे. २२ कॅरेट पिवळ्या सोन्यात घडवलेल्या या हारामध्ये कमळाच्या सात बहुपदरी पाकळ्या असून, प्रत्येक पाकळीत विवाहातील एक वचन अत्यंत नाजूक पद्धतीने कोरलेले आहे. हा हार केवळ दागिना नसून विवाहाच्या पवित्र बंधनाचे प्रतीक मानला जात आहे.

या अभियानासाठी तयार करण्यात आलेली जाहिरातही विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. विवाहसोहळ्यापूर्वीच्या काही हळव्या आणि मौल्यवान क्षणांवर आधारित ही जाहिरात आजच्या आधुनिक वधूचा आत्मविश्वास, भावना आणि दृष्टिकोन प्रभावीपणे मांडते. ‘दिल अभी भरा नहीं’ या ब्रँडच्या मूळ संकल्पनेशी ही जाहिरात अतिशय सुंदररीत्या जोडलेली आहे. वधूच्या आयुष्यातील जवळच्या व्यक्ती कुटुंबीय आणि आप्तेष्ट  तिच्या स्वप्नांचा कसा भाग असतात, हेही या जाहिरातीत भावनिक पद्धतीने दाखवण्यात आले आहे.

इंद्रियाचे सीईओ संदीप कोहली यांनी सांगितले की, “लग्नाचा दिवस येण्याच्या आधीपासूनच वधू तो दिवस आपल्या मनात जगत असते. या प्रवासात तिच्यासोबत चालण्याचे आणि तिचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे वचन आम्ही इंद्रियाच्या माध्यमातून देतो. आधुनिक दिमाख असो वा पारंपरिक वारसा, वधूच्या प्रत्येक कल्पनेला साजेसे दागिने देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

India Semiconductor Mission 2.0: ‘Made in India Chips’ लवकरच! बजेट 2026 मध्ये होणार ऐतिहासिक घोषणा

तर मार्केटिंग आणि व्हिज्युअल मर्चंडायजिंग विभागाचे प्रमुख शांतीस्वरूप पांडा म्हणाले की, हे अभियान प्रत्येक मुलीच्या स्वप्नातील वधुरूप दर्शवते. या जाहिरातीत वधू विवाहवेदीकडे जाण्यापूर्वी क्षणभर थांबून स्वतःचे रूप मनात साठवते, हा प्रसंग अत्यंत भावस्पर्शी आहे. एकूणच, इंद्रियाचे हे नवे ब्रायडल कॅम्पेन केवळ दागिन्यांचा संग्रह नसून, प्रत्येक वधूच्या भावना, स्वप्ने आणि तिच्या आयुष्यातील सर्वात खास क्षणांचा साजरा करणारा अनुभव ठरत आहे.

Web Title: Indriya along with aditya birla jewellery will help you create your dream bridal look

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • Gold Jewellery

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.