India Electronics Exports: भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना मिळाली जागतिक पसंती; तब्बल निर्यात 'इतक्या' कोटींच्या दिशेने (photo-social media)
India Electronics Exports: भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना परदेशात चांगली पसंती मिळू लागली आहे. २०२५ पर्यंत भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात ४ लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. ही वाढ मुख्यत्वे मोबाईल फोन सारख्या उत्पादनात सरकारी धोरणांमध्ये झालेल्या लक्षणीय वाढीमुळे झाल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. स्मार्टफोन निर्यात प्रमाण अलीकडे भारतात उत्पादित होणाऱ्या प्रत्येक ४ फोनपैकी १ फोन निर्यात केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस केवळ मोबाईल फोन निर्यात २.७ लाख कोटीपर्यंत पोहोचू शकते.
हेही वाचा: Mutual Funds Update: गुंतवणूकदारांच्या ‘या’ कारणाने बंद होतायत एसआयपी? जाणून घ्या सविस्तर
भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना परदेशातील या वाढीमुळे केवळ मोठ्या प्रमाणात रोजगारच उपलब्ध होत नाही तर मोठ्या प्रमाणात विदेशी चलन देखील मिळत आहे. ज्यामुळे भारतासह व्यावसायिकांना आर्थिक लाभ होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे मुद्दे आणि भविष्यातील शक्यता देखील तपासण्यात आल्या. त्यामध्ये सेमिकंडक्टर क्रांती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २०२६ मध्ये चार नवीन अर्थवाहक संयंत्रे व्यावसायिक उत्पादन सुरू करतील, ज्यामुळे निर्यात आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. ‘मेक इन इंडिया’ (Make In India) चा जागतिक विस्तार होताना भारत मोठी विक्रमी कामगिरी करत आहे.
हेही वाचा: UPI international payments: यूपीआयचा वेगाने जागतिक विस्तार! लवकरच ‘या’ देशांमध्ये होणार कार्यरत
या वाढत्या निर्यातीमुळे अॅपल वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दिशेने जात आहेत. भारतातील आयफोन निर्यातीत वर्षानुवर्षे जवळपास १००% वाढ झाली आहे. प्रीमियम आणि सुपर-प्रीमियम स्मार्टफोन विभागात अॅपल (Apple) आघाडीवर आहे. जागतिक पुरवठा साखळी चीनवरील अमेरिकेच्या कर आणि जागतिक कंपन्यांच्या ‘चायना प्लस वन’ धोरणाचा भारताला फायदा होत आहे. नील शाह (काउंटरपॉइंट) यांच्या मते, भारतात मोबाईल फोनचे उत्पादन ३०० दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचण्यावा अंदाज आहे. या सगळ्याचा भारताला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदे देखील होण्याची शक्यता आहे. ही वाढ केवळ मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करत नाही तर देशाला लक्षणीय परकीय चलन देखील मिळवून देत आहे.






