Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणूकदार मालामाल! दोन वर्षात 38 रुपयांचा शेअर थेट 4 हजारांच्या पुढे, आता स्टॉक स्प्लिटच्या तयारीत!

इन्सोलेशन एनर्जी या सोलर पॅनल निर्मिती कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. फक्त दोन वर्षांत इन्सोलेशन एनर्जीच्या शेअर्समध्ये तब्बल 10,900 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 21, 2024 | 07:50 AM
गुंतवणूकदार मालामाल! दोन वर्षात 38 रुपयांचा शेअर थेट 4 हजारांच्या पुढे, आता स्टॉक स्प्लिटच्या तयारीत!

गुंतवणूकदार मालामाल! दोन वर्षात 38 रुपयांचा शेअर थेट 4 हजारांच्या पुढे, आता स्टॉक स्प्लिटच्या तयारीत!

Follow Us
Close
Follow Us:

देशात केंद्र सरकारकडून सौर ऊर्जेला देण्यात येत असलेले प्राधान्याच्या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जा संबधित शेअर्समध्ये मोठी तेजी नोंदवली जात आहे. असाच एक शेअर म्हणजे इन्सोलेशन एनर्जी होय. या सोलर पॅनल निर्मिती कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. फक्त दोन वर्षांत इन्सोलेशन एनर्जीच्या शेअर्समध्ये तब्बल 10,900 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

इन्सोलेशन एनर्जीचा आयपीओ 26 सप्टेंबर 2022 रोजी उघडला. या आयपीओची किंमत 38 रुपये होती. इन्सोलेशन एनर्जीचे शेअर्स 19 नोव्हेंबर 2024 रोजी 4201.90 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 4750 रुपये आणि 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 595.15 रुपये आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

हे देखील वाचा – देशातील ‘या’ 7 शहरांमध्ये विकली जातायेत सर्वाधिक महागडी घरे; किंमतीत 23 टक्क्यांनी वाढ!

शेअर्समध्ये 10957 टक्क्यांची वाढ

इनसोलेशन एनर्जी लिमिटेडचे शेअर्स गेल्या 25 महिन्यांत 10957 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचा आयपीओ 26 सप्टेंबर 2022 रोजी उघडण्यात आला आणि तो 29 सप्टेंबरपर्यंत खुला राहिला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 38 रुपये होती. इनसोलेशन एनर्जीचे शेअर्स 10 ऑक्टोबर 2022 रोजी 100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 76.10 रुपयांवर सूचीबद्ध झाले.

लिस्टींगच्या दिवशी कंपनीचे शेअर्स 79.90 रुपयांपर्यंत वेगाने वाढले. लिस्टिंग झाल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. 19 नोव्हेंबर 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 4201.90 रुपयांवर बंद झाले.

हे देखील वाचा – एका गाण्यासाठी घेतात 3 कोटी, 1700 कोटींची संपत्ती; वाचा… ए. आर. रहमान यांच्याकडे काय-काय आहे?

कंपनीकडून स्टॉक स्प्लिटची घोषणा

इन्सोलेशन एनर्जी त्यांचे शेअर्सचे विभाजन करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 5 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत शेअर विभाजनाचा विचार केला आणि त्याला मंजुरी दिली. सौर पॅनल निर्मिती कंपनी इन्सोलेशन एनर्जी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेला आपला हिस्सा प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10 शेअर्समध्ये विभागत आहे. कंपनीने अद्याप शेअर विभाजनाची रेकॉर्ड तारीख निश्चित केलेली नाही.

कंपनीचा आयपीओ 192 पेक्षा जास्त पट सबस्क्राइब

इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडचा आयपीओ एकूण 192.79 पट सबस्क्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव भाग 235.55 पट, बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा भाग 150.02 पट सबस्क्राइब झाला होता.

हे देखील वाचा – उद्योगपती मुकेश अंबानींनी केले मतदान, कुंटूंबियांसोबत दिसले मतदान केंद्रावर; पाहा… व्हिडिओ!

काय करते ही कंपनी?

इनसोलेशन एनर्जी लिमिटेड ही एक अग्रगण्य राष्ट्रीय सौर ऊर्जा प्रदाता कंपनी आहे. जी सौर ईपीसी डोमेनमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारी संस्था आहे. बीएसई, एसएमई लिस्टेड कंपनी असलेल्या या कंपनीने 500 MW पेक्षा जास्त सोलर पीव्ही मॉड्युलमध्ये नवनवीन, विकसित, अभियांत्रिकी आणि जोडणी केली आहे. ज्यामुळे भारताच्या ऊर्जेचा लँडस्केप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बदलला आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Insolation energy share rs 38 went straight to rs 4000 in two years now preparing for a stock split

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 07:50 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.