गुंतवणुकीची संधी! 11 डिसेंबरला खुला होणार 'हा' तगडा आयपीओ, वाचा... कितीये किंमत पट्टा
मोबिक्विक सिस्टिम्स लिमिटेड कंपनीने आयपीओच्या माध्यमातून खुली समभाग विक्री करण्यासाठी किंमत पट्टा प्रतिसमभाग 265 रुपये ते 279 रुपये इतका निश्चित केला आहे. आयपीओ माध्यमातून विक्रीस काढण्यात आलेल्या प्रत्येक समभागाचे फेस व्हॅल्यू 2 रुपये ठेवण्यात आली आहे. मोबिक्विक ही कंपनी ग्राहक व व्यापारी यांच्यासाठी दुहेरी पेमेंट व्यवस्था असलेलेएक व्यासपीठ आहे.
कधी खुला होणार हा आयपीओ
मोबिक्विक सिस्टिम्स लिमिटेडची आयपीओ ऑफर बुधवार दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुली होईल आणि शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर2024 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान 53 समभागांच्या लॉटसाठी व त्यापुढे 53 समभागाच्यापटीत गुंतवणूकीसाठी बोली लावू शकतील. कंपनीचा हा आयपीओ पूर्णत: फ्रेश इश्यू असून त्यायोगेरु. 572 कोटी भांडवल उभारण्यात येणार आहे. यात ऑफर फॉर सेल भागाचा समावेश करण्यात आलेला नाही.
कुठे वापरला जाणार हा निधी
कंपनीच्या या फ्रेश इश्यूमधून उभारल्या जाणाऱ्या भांडवलापैकी 150 कोटी रुपये कंपनीच्या वित्तीय सेवा विभागाचा विस्तार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. तर 135 कोटी कंपनीच्या पेमेंट सेवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे 107 कोटी डेटा, एमएल, एआय संशोधन व विकास म्हणजेआर अँड डी कार्यासाठी गुंतविण्यात येणार आहेत. तसेच प्रॉडक्ट व टेक्नॉलॉजीसाठीही यारकमेतून गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रु. 70.28 कोटी पेमेंट डिव्हाईस व्यवसायात भांडवली गुंतवणूक म्हणून वापरण्यात येणार आहेत. तर काही रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतुंसाठी वापरण्यात येणार आहे.
आरबीआयचा मोठा निर्णय! आता UPI द्वारे ‘या’ बँकांकडूनही मिळणार कर्ज!
कंपनीने किती कमावलाय नफा
बिपिन प्रीत सिंग व उपासना ताकू यांनी पेमेंट सर्व्हिस व वित्तीय सेवा देण्याच्या प्रमुख उद्देशानेच वन मोबिक्विक सिस्टिम्स कंपनीची स्थापना केली होती. 30 जून 2024 पर्यंत या व्यासपीठावर तब्बल 161.03 दशलक्ष ग्राहकांची नोंदणी झाली आहे. तसेच 4.26 दशलक्ष व्यापाऱ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने या सेवेचा लाभ घेतला आहे. मोबिक्विक कंपनी सातत्याने आपल्या डिजिटल क्रेडिट, गुंतवणूक व विमा व्यवसायात नवनवीन उत्पादने सादर करुन ग्राहकांसाठी व्यासपीठाच्या मूल्यात वाढ करत असते. यातून एक व्यापक वनफादायक व्यवस्था निर्माण व्हावी हाच कंपनीचा हेतू आहे. कंपनीच्या या धोरणामुळेच 31 मार्च 2024 रोजी समाप्त आर्थिक वर्षात कंपनीने 14.08 कोटींचा नफा कमावला आहे.
मोबिक्विककडे 161.03 दशलक्ष नोंदणीकृत गाहक
कंपनीच्या पेमेंट जीव्हीएममध्ये वर्षिक 45.88 टक्के दराने वाढ झाली आहे. तसेच मोबिक्विक झीप जीएमव्ही मध्येतर साल 2022 ते 2024 दरम्यान वार्षिक 112.16 टक्के वाढ झाली आहे. जून 2024 पर्यंत मोबिक्विकने देशातील 99 टक्के पीन कोड क्षेत्रात आपले ठसठशित अस्तित्व निर्माण केले आहे. मोबिक्विककडे आता 161.03 दशलक्ष नोंदणीकृत गाहक आहेत. यापैकी 70.88 दशलक्ष ग्राहकांची केवायसी पूर्णअसून त्यांनी जीव्हीएम व्यासपीठाच्या माध्यमातून रु. 28,578.25 कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच कंपनीने गेल्या वर्षभरात रु.2,346.71 कोटी रुपयांची कर्जवितरण सुविधा उपलब्ध केली आहे.