
Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घट! आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावाचा झाला परिणाम
Gold Silver Price Today: गुरुवारी ८ जानेवारी २०२६ रोजी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी ११ वाजता, सोन्याचा भाव मागील सत्राच्या तुलनेत ०.६८ टक्क्यांनी घसरून प्रति १० ग्रॅम १,३७,०६७ रु. झाला. चांदीच्या किमतीही १.६२ टक्क्यांनी घसरून प्रति किलो २,४६,५५० रू. झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमती घसरल्या असून सोन्याचा भाव प्रति औंस सुमारे $४,४४० वर पोहोचला. गुंतवणूकदारांनी अमेरिकेतील मिश्र आर्थिक डेटा आणि भू-राजकीय घडामोडीमुळे ही घसरण झाली.
हेही वाचा: Telecom Operators Penalty: स्पॅम कॉलवर लगाम न लावल्याने टेलिकॉम कंपन्यांना १५० कोटींचा दंड
भारतात आज सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली. २४ कॅरेट सोन्याचा भाव सकाळी प्रति १० ग्रॅम १,३८,८३० रुपयांवरून घसरून १,३८,२६० रुपयांवर आला. २२ कॅरेट सोन्याचा भावही प्रति १० ग्रॅम १,२६,७४० रुपयांवर घसरून १,२७,२६० रुपयांवर आला, जो काल प्रति १० ग्रॅम १,३७,०६७ रु. आहे. १८ कॅरेट सोन्याचा भावही प्रति १० ग्रॅम १,०३,७०० रुपयांवर घसरला, जो पूर्वी प्रति १० ग्रॅम १,०४,१३० रुपयांवरून घसरला. चांदीच्या किमतीतही घट झाली, एक किलो चांदीची किंमत आज २,५७,१०० रुपयांवर पोहोचली.
हेही वाचा: Infosys AWS Partnership: इन्फोसिस आणि एडब्ल्यूएस यांची भागीदारी! एंटरप्राइझ एआयला मिळणार गती
भारतातील मोठ्या शहरांमध्ये सोन्याच्या किमती थोड्या वेगळ्या आहेत. ८ जानेवारी रोजी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १३,८१५ रूपये आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १२,६६५ रूपये आणि १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १०,३६५ रूपये आहे. मुंबई आणि कोलकातामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १३,८०० रूपये, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १२,६५० रूपये आणि १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १०,३५० रूपये होता. दरम्यान, चेन्नईमध्ये सोन्याच्या किमती किंचित जास्त होत्या, जिथे २४ कॅरेट सोन्याचा दर १३,९०९ रूपये, २२ कॅरेट सोन्याचा दर १२,७५० रूपये आणि १८ कॅरेट सोन्याचा दर १०,६४० रूपये प्रति ग्रॅम होता. त्याचप्रमाणे, बंगळुरूमध्ये सोन्याचे दर मुंबई आणि कोलकाताप्रमाणेच १३,८०० रूपये, १२,६५० रूपये आणि १०,३५० रूपये प्रति ग्रॅम राहिले.