Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा आयपीओ 7 जानेवारीला खुला होणार, वाचा… कितीये पट्टा!

मध्य प्रदेशस्थित बीआर गोयल इन्फ्रास्ट्रक्चरचा आयपीओ 7 जानेवारी रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहे. आयपीओतून कंपनी 85.21 कोटी रुपये उभारणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jan 03, 2025 | 09:13 PM
इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा आयपीओ 7 जानेवारीला खुला होणार, वाचा... कितीये पट्टा!

इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा आयपीओ 7 जानेवारीला खुला होणार, वाचा... कितीये पट्टा!

Follow Us
Close
Follow Us:

मध्य प्रदेशस्थित बीआर गोयल इन्फ्रास्ट्रक्चरचा आयपीओ 7 जानेवारी रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहे. आयपीओतून कंपनी 85.21 कोटी रुपये उभारणार आहे. गुंतवणूकदारांना आयपीओसाठी 9 जानेवारीपर्यंत बाेली लावता येणार आहे.

किती आहे किंमत पट्टा

बीआर गोयल इन्फ्रास्ट्रक्चरने आयपीओसाठी प्रति शेअर 128-135 रुपयांचा किंमत बँड निश्चित करण्यात आला आहे. आयपीओमध्ये कंपनी 85.21 कोटी रुपयांचे 63.12 लाख नवीन शेअर्सची विक्री करणार आहे. ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे कोणतीही विक्री होणार नाही. म्हणजे यातून मिळणारी संपूर्ण रक्कम कंपनीकडे जाईल. शेअर्सचे वाटप 10 जानेवारी रोजी हाेईल. तर 13 जानेवारीपासून रिफंड प्रक्रिया सुरू होईल. शेअर्सचे लिस्टिंग बीएसई एसएमईवर 14 जानेवारीला हाेणार आहे.
(फोटो सौजन्य – istock)

Farmer Success Story : 9 गायींपासून केली सुरुवात, आज आहे तब्बल 240 गायींचा गोठा; महिला शेतकऱ्याची कमाल!

निधी कुठे वापरला जाणार

आयपीओची रक्कम भांडवली खर्च, खेळत्या भांडवलाच्या गरजा, अधिग्रहणांद्वारे सेंद्रिय वाढ आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरली जाईल. बीलाइन कॅपिटल अॅडवाइजर्सही एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. कंपनीने आयपीओ लाँच होण्यापूर्वी प्री आयपीओ राऊंडद्वारे 1.2 लाख शेअर्स जारी करून 1.5 कोटी रुपये उभे केले आहेत. त्यामुळे आयपीओचा आकार आधीच्या 64.32 लाख शेअर्सवरून 63.12 लाख शेअर्स इतका कमी करण्यात आला आहे.

बाजार घसरणीतही ‘हा’ शेअर लागतोय अप्पर सर्किटला; 15 टक्क्यांच्या उसळीमुळे गुंतवणूकदार सुखावले!

कंपनीचा व्यवसाय

बीआर गोयल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची स्थापना 2005 मध्ये झाली. कंपनी तृतीय पक्षांना (प्रामुख्याने सरकारी विभागांसाठी) अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम सेवा प्रदान करते. कंपनी मुख्यत्वे रस्ते आणि महामार्ग, व्यापारी संकुल, औद्योगिक उद्याने आणि गृहनिर्माण प्रकल्पांवर काम करते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, मिझोराम आणि मणिपूरसह भारतातील अनेक राज्यांमध्ये कंपनीचे प्रकल्प सुरू आहेत. कंपनी पवन ऊर्जा निर्मिती, रेडी-मिक्स काँक्रिट आणि टोल वसुली करार निर्मितीमध्ये देखील आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Ipo br goyal infrastructure ipo to open for subscription on january 7

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 09:13 PM

Topics:  

  • Initial Public Offering
  • IPO

संबंधित बातम्या

Vi Share Market Update: 10 रुपयांचा छोटा स्टॉक ठरतोय ‘बडा धमाका’, गुंतवणूकदारांची लॉटरी लागणार?
1

Vi Share Market Update: 10 रुपयांचा छोटा स्टॉक ठरतोय ‘बडा धमाका’, गुंतवणूकदारांची लॉटरी लागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.