Farmer Success Story : 9 गायींपासून केली सुरुवात, आज आहे तब्बल 240 गायींचा गोठा; महिला शेतकऱ्याची कमाल!
सध्याच्या घडीला देशातील अनेक भागांमध्ये शेतीसह शेतीआधारित उद्योग व्यवसायांना मोठे महत्व प्राप्त झाले आहे. तरुण, उच्चशिक्षित इतकेच नाही तर महिलांचा देखील शेती आणि शेतीआधारित उद्योगधंद्यांकडे ओढा वाढला आहे. विशेष म्हणजे जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांना मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत आहे. आज आपण अशाच एक महिला शेतकऱ्याची यथोगाथा पाहणार आहोत.
९ गायींपासून सुरु केला व्यवसाय
रेणु सांगवान असे या महिला शेतकऱ्याचे नाव असून, त्या हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्याच्या खरमाण गावच्या रहिवासी आहेत. त्यांनी २०१७ मध्ये ९ गायींच्या गोठ्यापासून सुरुवात करुन,आपल्या दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली होती. आज त्यांच्याकडे जवळपास २४० हून अधिक गायींचा गोठा आहे. त्यामुळे त्यांना वार्षिक कोट्यावधी रुपयांची कमाई होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन आज आपण त्यांच्या दुग्ध व्यवसायातील यशाबद्दल जाणून घेणार आहोत.
‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये; ‘ही’ प्रक्रिया पुर्ण कराच!
तयार केला तब्बल २४० गायींचा गोठा
रेणु सांगवान २०१७ साली दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. अर्थात अल्पावधीतच त्यांनी दुग्ध व्यवसायात कमाल करून दाखवली आहे. त्यांनी अवघ्या ७ ते आठ वर्षांमध्ये २४० गायींचा मोठा गोठा तयार केला आहे. त्यामुळे त्या देशभरातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आदर्शवत ठरत आहे. त्यांनी देशी गायी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दुग्ध व्यवसायात ही किमया साधली आहे. त्यांच्या याच यशाची दखल घेऊन राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे.
बाजार घसरणीतही ‘हा’ शेअर लागतोय अप्पर सर्किटला; 15 टक्क्यांच्या उसळीमुळे गुंतवणूकदार सुखावले!
किती होतीये वर्षाला कमाई
रेणु सांगवान सांगतात, आपण आपल्या डेअरी फार्मला ‘गोकुल फार्म श्रीकृष्ण गोधाम’ असे नाव दिले आहे. ज्याचे आता एका आदर्श डेअरी फार्ममध्ये रुपांतर झाले आहे. २४० देशी गायींची संख्या पाहता त्यांना वर्षाला दुग्धव्यवसायातून तब्बल 3 कोटींची कमाई होत असल्याचे त्या सांगतात. त्यांच्या दुग्ध व्यवसायातील यशात तूप, पनीर, बर्फी आणि च्यवनप्राश या प्रक्रिया केलेल्या प्रॉडक्टसचा मोठा वाटा आहे. याशिवाय त्यांनी आपल्या दुग्धव्यवसायासाठी देशी गायींसह आधिनुक तंत्रज्ञानाचा आधार घेतल्याने मोठा फायदा झाल्याचे ते सांगतात.