Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…या आठवड्यात ‘हे’ तीन जबरदस्त आयपीओ येणार; पैसे कमवण्याची गुंतवणूकदारांना मोठी संधी!

चालू आठवड्यात 21 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत एकूण 10,985 कोटी रुपयांचे आयपीओ शेअर बाजारात दाखल होणार आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 21, 2024 | 09:49 PM
गुंतवणुकीची संधी! 11 डिसेंबरला खुला होणार 'हा' तगडा आयपीओ, वाचा... कितीये किंमत पट्टा

गुंतवणुकीची संधी! 11 डिसेंबरला खुला होणार 'हा' तगडा आयपीओ, वाचा... कितीये किंमत पट्टा

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय शेअर बाजारात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. असे असले तरी गेल्या काही महिन्यांत आलेल्या बहुसंख्य आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. या आठवड्यातही अनेक आयपीओ येणार आहेत. या आयपीओंच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवता येऊ शकतो. या आठवड्यात (21 ते 25 ऑक्टोबर) एकूण 10,985 कोटी रुपयांचे आयपीओ येणार आहेत. यासह ह्युंदाई मोटर्स या मोठ्या आयपीओसह अन्य तीन आयपीओंची शेअर बाजारावर लिस्टिंग होणार आहे.

ह्युंदाई मोटर्सचा आयपीओ एकूण 27,870 कोटी रुपयांचा होता. या आयपीओची लिस्टिंग 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सोबतच एसएमई श्रेणीतील लक्ष्य पॉवरटेक आणि फ्रएशरा अॅग्रो एक्सपोर्टर्स या कंपन्या शेअर बाजारावर 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी सूचिबद्ध होतील.

वारी एनर्जीजचा आयपीओ : वारी एनर्जीजचा आयपीओ हा 21 ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 1,427-1,503 रुपये प्रति शेअर आहे. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून एकूण 4,321 कोटी रुपये उभे करणार आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूकदारांना या आयपीओत गुंतवणूक करता येईल. या आयपीओत एकूण 3,600 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स असतील तर 721.44 कोटी रुपयांचे 48 लाख शेअर्स हे ऑफर-फॉर-सेल (ओएफएस) च्या माध्यमातून विकण्यात येतील.

हे देखील वाचा – 1 लाखाचे 5 वर्षात झाले 1 कोटी; शेअर्सने एका वर्षात दिला गुंतवणूकदारांना 3700 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा!

दीपक बिल्डर्स अँड इंजिनिअर्सचा आयपीओ : या कंपनीने आयपीओ आणण्याआधी अँकर गुंतवणूकदारांकडून 18 ऑक्टोबर रोजी 1,277 कोटी रुपये उभे केले आहेत. प्रीमियर एनर्जीज आणि वेबसोल एनर्जी यासारख्या बड्या कंपन्या या कंपनीच्या प्रतिस्पर्धी आहेत. दीपक बिल्डर्स अँड इंजीनिअर्स इंडिया या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या काळात गुंतवणुकीसाठी खुला असेल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी एकूण 260 कोटी रुपये उभे करणार आहे. या आयपीओत एकूण 217 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स तर 42.83 कोटी रुपयांचे ओएफएस शेअर्स असतील.

गोदावरी बायोरिफायनरीजचा आयपीओ : गोदावरी बायोरिफायनरीज या कंपनीच्या आयपीओत 23 ते 25 ऑक्टोबर या काळात गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून गोदावरी बायोरिफायनरीज ही कंपनी एकूण 555 कोटी रुपये उभे करणार आहे. या आयपीओत 325 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स असतील. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून एकूण 65.26 लाख शेअर्सची विक्री करणार आहे. या कंपनीच्या शेअर्सचा किंमत पट्टा 334 ते 352 रुपये प्रति शेअर आहे.

शापूरजी पालोनजी ग्रुपचा आयपीओ : शापूरजी पालोनजी ग्रुपचा एक महत्त्वाचा आयपीओ याच आठवड्यात येणार आहे. हा आयपीओ गुंतवणुकीसाठी 25 ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होईल. ही कंपनी आयपीओतून 5,430 कोटी रुपये उभे करणार आहे. या आयपीओच्या प्राईस बँडची घोषणा 21 रोजी होणार आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Ipo this week have three stunning ipo big opportunity for investors to make money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 09:14 PM

Topics:  

  • Initial Public Offering
  • IPO

संबंधित बातम्या

Anondita Medicare IPO चा ‘जीएमपी’ ठरला रॉकेट, सबस्क्रिप्शनच्या पहिल्याच दिवशी किरकोळ गुंतवणूकदारांकडून उत्कृष्ट प्रतिसाद
1

Anondita Medicare IPO चा ‘जीएमपी’ ठरला रॉकेट, सबस्क्रिप्शनच्या पहिल्याच दिवशी किरकोळ गुंतवणूकदारांकडून उत्कृष्ट प्रतिसाद

86 ते 90 रुपयांच्या किंमत पट्ट्यासह एनलॉन हेल्थकेअरचा IPO उघडण्यास सज्ज, सबस्क्रिप्शन तारीख आणि गुंतवणूक तपशील जाणून घ्या
2

86 ते 90 रुपयांच्या किंमत पट्ट्यासह एनलॉन हेल्थकेअरचा IPO उघडण्यास सज्ज, सबस्क्रिप्शन तारीख आणि गुंतवणूक तपशील जाणून घ्या

शेअरची किंमत ८० रुपये, GMP आता ४० रुपयांवर, पुढील आठवड्यात सुरू होत आहे ‘या’ कंपनीचा IPO
3

शेअरची किंमत ८० रुपये, GMP आता ४० रुपयांवर, पुढील आठवड्यात सुरू होत आहे ‘या’ कंपनीचा IPO

मंगल इलेक्ट्रिकल्सच्या IPO सबस्क्रिप्शनमध्ये वाढ, जीएमपीसह इतर तपशील तपासा
4

मंगल इलेक्ट्रिकल्सच्या IPO सबस्क्रिप्शनमध्ये वाढ, जीएमपीसह इतर तपशील तपासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.