
फोटो सौजन्य - Social Media
भारतातील बदलत्या लाइफस्टाइल आणि धावपळीच्या सकाळी लक्षात घेऊन ITC Limited च्या फूड्स विभागाने Sunfeast Breakfast Smoothie हे नवीन रेडी-टू-ड्रिंक बेव्हरेज लॉन्च केले आहे. आधुनिक ग्राहकांच्या ऑन-द-गो जीवनशैलीसाठी तयार करण्यात आलेले हे उत्पादन सोयीसह चव आणि पोषण यांचा उत्तम संगम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यासोबतच ब्रँडने एक आकर्षक डिजिटल जाहिरात फिल्मही सादर केली आहे.
नवीन Sunfeast Breakfast Smoothie मध्ये केळी, दूध, बदाम, ओट्स, खजूर आणि ४ सुपर सीड्सचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक सर्व्हिंगमध्ये ६ ग्रॅम प्रोटीन देणाऱ्या या स्मूदीमध्ये अतिरिक्त साखर, प्रिझर्व्हेटिव्ह्स किंवा कृत्रिम फ्लेवर्स नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. आरोग्याबाबत जागरूक होत असलेल्या ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
सध्या भारतात नाश्त्याच्या सवयी झपाट्याने बदलत आहेत. वाढती धावपळ, व्यस्त दिनचर्या आणि आरोग्याबाबतची जागरूकता यामुळे ग्राहक आता झटपट, पोर्टेबल आणि सहज वापरता येणाऱ्या फूड व बेव्हरेज पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर Sunfeast Breakfast Smoothie बाजारात आणण्यात आल्याचं कंपनीने सांगितलं.
या लॉन्चबाबत बोलताना Vivek Kookkal, व्हाइस प्रेसिडेंट आणि हेड – डेअरी अँड बेव्हरेजेस, फूड्स डिव्हिजन, ITC Ltd. यांनी सांगितले की, “आज विशेषतः Gen Z ग्राहकांना चवदार आणि सोयीस्कर पर्यायांची गरज आहे. ग्राहकांच्या या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन आम्ही नाविन्यपूर्ण उत्पादन म्हणून Sunfeast Breakfast Smoothie सादर केलं आहे.”
ब्रँडच्या नव्या डिजिटल फिल्ममध्ये एका तरुणीचा किचनमधील अनुभव रंगतदार आणि ऊर्जा भरलेला दाखवण्यात आला आहे. एका साध्या स्मूदीचा घोट घेतल्यानंतर तिचं किचन जणू परफॉर्मन्स स्टेजमध्ये बदलतं, जिथे फिरणाऱ्या बाटल्या आणि हवेत उडणारे पदार्थ या दृश्यांमधून उत्पादनाची मजेदार आणि आधुनिक मांडणी करण्यात आली आहे.
Sunfeast Breakfast Smoothie हे उत्पादन खास करून सकाळच्या प्रवासात, ऑफिसच्या धावपळीत किंवा मधल्या वेळच्या भुकेसाठी तयार करण्यात आले आहे. १६० मिलीच्या पॅकमध्ये उपलब्ध असलेलं हे उत्पादन ४५ रुपयांच्या किमतीत बाजारात आणण्यात आलं असून, मेट्रो शहरांमध्ये क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स, मॉडर्न ट्रेड आणि जनरल ट्रेड स्टोअर्समध्ये ते उपलब्ध आहे.