Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solar News : आता वीज बिल येणार झिरो! पाचोऱ्यात हजारो ग्राहकांचा सोलर योजनेला उदंड प्रतिसाद; अवघ्या 8-10 दिवसांत प्रक्रिया पूर्ण

Jalgaon Solar News : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा उपविभाग ग्रामीण भागात महावितरणच्या 'स्मार्ट' रूफटॉप सोलर योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून सुमारे १२ हजार ग्राहकांनी वीज बिल शून्यावर आणण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 05, 2026 | 05:01 PM
१२ हजार ग्राहकांना मिळणार 'स्मार्ट' सोलरचा लाभ ( सौजन्य - सोशल मीडिया )

१२ हजार ग्राहकांना मिळणार 'स्मार्ट' सोलरचा लाभ ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • पाचोरा तालुक्यात सौरऊर्जेचा धमाका!
  • १२ हजार ग्राहकांना मिळणार ‘स्मार्ट’ सोलरचा लाभ
  • वीज बिल होणार शून्य
Jalgaon Solar News : सर्वसामान्य घरगुती ग्राहकांचे वीज बिल कमी करण्याबरोबरच ते शून्यावर आणण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘स्मार्ट’ रूफटॉप सोलर योजनेला पाचोरा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महावितरणच्या पाचोरा उपविभाग ग्रामीणअंतर्गत तब्बल 12 हजार ग्राहकांनी 1 किलोवॅट सोलर योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे 1 हजार 800 ते 1 हजार 850 ग्राहकांच्या घरांवर सोलर बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, उर्वरित ग्राहकांचेही अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. ( Jalgaon Solar News ) 

PM Kisan योजनेचा 24 वा हप्ता येण्यापूर्वी 4 मोठ्या अपडेट! शेतकऱ्यांनो, तात्काळ करा ‘ही’ कामे!

महावितरणच्या पाचोरा उपविभाग ग्रामीणमध्ये पिंपळगाव हरेश्वर, वरखेडी, नांद्रा, लासगाव आणि लोहारा या पाच सेक्शनचा समावेश आहे. या पाच सेक्शनअंतर्गत सुमारे 45 ते 46 गावांतील 18 हजार 500 घरगुती वीज ग्राहक आहेत. त्यापैकी 12 हजार 6 ग्राहकांनी शासनाच्या ‘स्मार्ट’ रूफटॉप सोलर योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सौरऊर्जेचा वापर वाढण्याची शक्यता आहे.

प्रवर्गानुसार लाभार्थ्यांचा हिस्सा

या योजनेंतर्गत 1 किलोवॅट क्षमतेच्या सोलर सिस्टीमसाठी लाभार्थ्यांना प्रवर्गानुसार रक्कम भरावी लागणार आहे. बीपीएल प्रवर्गातील ग्राहकांना 2 हजार 500 रुपये, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील ग्राहकांना 5 हजार रुपये, तर ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातील ग्राहकांना 10 हजार रुपये भरावे लागणार आहेत. त्यानंतर संबंधित ग्राहकाच्या घरावर सोलर सिस्टीम बसविण्याची प्रक्रिया केली जाते.

अर्जानंतर आठ ते दहा दिवसांत प्रक्रिया

सोलर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम 1 किलोवॅट सोलर ॲक्टिव्हेशनसाठी अर्ज करावा लागतो. यासाठी वीज बिल आणि आधारकार्ड ही प्रमुख कागदपत्रे आवश्यक आहेत. एकाच वेळी साधारण दहा अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित वेंडरच्या माध्यमातून सोलर बसविण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. ही प्रक्रिया साधारण आठ ते दहा दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सोलर सिस्टीम कार्यान्वित झाल्यानंतर त्याचा वीज बिलावर थेट परिणाम दिसून येतो.

विशेष म्हणजे, 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांनाही सोलरचा लाभ मिळणार आहे. सोलर निर्मिती आणि वापरानुसार जमा होणाऱ्या युनिटचा ग्राहकांना फायदा होतो. त्यामुळे कमी वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीही ही योजना फायदेशीर ठरणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

वीज बिलानुसार 1, 3 किंवा 5 किलोवॅटचा पर्याय

ज्या ग्राहकांचे वीज बिल अधिक आहे, अशा ग्राहकांना त्यांच्या विजेच्या वापरानुसार 1 किलोवॅट, 3 किलोवॅट किंवा 5 किलोवॅट क्षमतेची सोलर सिस्टीम बसविता येणार आहे. त्यामुळे अधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांनाही त्यांच्या गरजेनुसार सौरऊर्जेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

Aadhaar Card वरील नाव बदलणे आता सोपं नाही! UIDAI कडून नवीन SOP जारी; ‘या’ गोष्टी झाल्या अनिवार्य

Web Title: Jalgaon pachora 12 thousand consumers to get smart rooftop solar benefit ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Jalgaon
  • Solar Panel

संबंधित बातम्या

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद
1

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद

Jalgaon News: यावलकरांसाठी मोठी बातमी! ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर, ५० टक्के काम पूर्ण
2

Jalgaon News: यावलकरांसाठी मोठी बातमी! ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर, ५० टक्के काम पूर्ण

Jalgaon News: पाणीटंचाईची चाहूल लागताच प्रशासन अलर्ट! ‘या’ तारखेरपूर्वी पाणी आराखडा तयार करण्याचे आदेश
3

Jalgaon News: पाणीटंचाईची चाहूल लागताच प्रशासन अलर्ट! ‘या’ तारखेरपूर्वी पाणी आराखडा तयार करण्याचे आदेश

Farmmers Impact On Kharif Crops : शेतकऱ्यांच्या उत्पादनावर घट, खरीप पिकांवर मोठा परिणाम…..
4

Farmmers Impact On Kharif Crops : शेतकऱ्यांच्या उत्पादनावर घट, खरीप पिकांवर मोठा परिणाम…..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.