Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कंपनीला मिळाल्या कोट्यवधींच्या ऑर्डर; शेअरने गाठला विक्रमी उच्चांक, 110 देशांमध्ये आहे व्यवसाय!

जागतिक इन्फ्रा दिग्गज केईसी इंटरनॅशनलला सौदी अरेबियाकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीला 11300 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. याबाबतची माहिती समोर येताच कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. आज शेअरने उच्चांकी पातळी गाठली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 06, 2024 | 09:49 PM
'या' कंपनीला मिळाल्या कोट्यवधींच्या ऑर्डर; शेअरने गाठला विक्रमी उच्चांक, 110 देशांमध्ये आहे व्यवसाय!

'या' कंपनीला मिळाल्या कोट्यवधींच्या ऑर्डर; शेअरने गाठला विक्रमी उच्चांक, 110 देशांमध्ये आहे व्यवसाय!

Follow Us
Close
Follow Us:

केईसी इंटरनॅशनल ही एक जागतिक पायाभूत सुविधा ईपीसी कंपनी आहे. जी आरपीजी समूहाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जगातील 110 हून अधिक देशांमध्ये कंपनीचे कामकाज आहे. या कंपनीला सौदी अरेबियाकडून 1423 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. गुरुवारी (ता.५) हा शेअर सहा आणि सव्वा टक्क्यांच्या वाढीसह 990 रुपयांवर बंद झाला आहे. तर आज हा शेअर इंट्राडेमध्ये 1003 रुपयांचा नवीन उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

हे देखील वाचा – शेअर बाजाराची पडझड, मात्र… हा स्टॉक करतोय दमदार कामगिरी, भविष्यात देणार जबरदस्त रिटर्न्स!

कोणत्या मिळाल्या आहेत कंपनीला

केईसी इंटरनॅशनलने शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत म्हटले की, सौदी अरेबियाकडून 380 केव्ही ट्रान्समिशन लाइनसाठी 1423 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विमल केजरीवाल यांनी सांगितले की, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन व्हर्टिकलमध्ये चांगले ट्रॅक्शन दिसत आहे. या वर्षी आतापर्यंत कंपनीला 11300 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 75 टक्के अधिक आहे. याआधी कंपनीला यूएई आणि ओमानमधूनही ऑर्डर मिळाल्या होत्या. सौदी अरेबियाच्या नवीन ऑर्डरमध्ये कंपनीचे मध्य पूर्वेतील मजबूत अस्तित्व दिसून येते.

हे देखील वाचा – ज्या कॉलेजने प्रवेश नाकारला, त्याच कॉलेजने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले; वाचा… गौतम अदानी यांच्या शालेय जीवनातील रंजक किस्सा

कंपनीचा व्यवसाय 110 हून अधिक देशांमध्ये

केईसी इंटरनॅशनल ही जागतिक अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) कंपनी आहे. ही कंपनी पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन, सिव्हिल, रेल्वे, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, रिन्युएबल, ऑइल आणि गॅस आणि केबल सेगमेंटमध्ये काम करते. 110 हून अधिक देशांमध्ये कंपनीची उपस्थिती आहे.

केईसी शेअर्सची बाजारातील कामगिरी

केईसी इंटरनॅशनलच्या शेअर्सने प्रथमच 1000 चा टप्पा ओलांडला आहे. गेल्या एका आठवड्यात या शेअरने सुमारे 10 टक्के, दोन आठवड्यात 20 टक्के, एका महिन्यात 19 टक्के, तीन महिन्यांत 37 टक्के, सहा महिन्यांत 36 टक्के परतावा दिला आहे आणि या वर्षात आतापर्यंत सुमारे 65 टक्के परतावा दिला आहे. एक दिवस वगळता, गेल्या 10 ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअरमध्ये सतत वाढ होत आहे. या वाढीमध्ये 830 रुपयांचा शेअर 1000 रुपयांवर पोहोचला आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Kec international company received orders worth crores shares hit record highs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 09:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.